मालेगावी शेतकऱ्यांच्या समर्थनार्थ धरणे आंदोलन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 18, 2020 00:25 IST2020-12-17T20:39:49+5:302020-12-18T00:25:47+5:30
मालेगाव : केंद्र सरकारने शेतकरी कायदे रद्द करावेत या मागणीसाठी वंचित बहुजन आघाडीतर्फे जिल्हाध्यक्ष कपिल अहिरे यांच्या नेतृत्वाखाली धरणे आंदोलन करण्यात आले. यावेळी विविध मागण्यांचे निवेदन विजयानंद शर्मा यांना देण्यात आले.

मालेगावी शेतकऱ्यांच्या समर्थनार्थ धरणे आंदोलन
निवेदनात म्हटले आहे की, शेतकऱ्यांच्या शेतमालाला किमान आधारभूत किंमत मिळण्यासाठी कायद्यात स्पष्ट तरतूद करावी. रेल्वेच्या खासगीकरणाचा निर्णय केंद्र शासनाने मागे घ्यावा. राज्यातील महाविकास आघाडी सरकारने दिल्लीतील शेतकरी आंदोलनाला पाठिंबा दिला असल्यास राज्यात शेतकरीविरोधी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या कायद्यात दुरुस्ती करणारा अध्यादेश काढून हमीभाव मिळण्यासाठी कायद्यात तरतूद करावी आदी मागण्यांचा समावेश आहे. निवेदनावर महासचिव संजय जगताप, जितरत्न पटाईत, युवराज वाघ, राजेंद्र पवार, शांताराम सोनवणे, मुकेश खैरनार, राजू ढिवरे, योगेश निकम यांच्या सह्या आहेत.