दहेगाव धरण भरले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 22, 2020 18:04 IST2020-09-22T18:02:29+5:302020-09-22T18:04:03+5:30
नांदगाव : तब्बल अकरा वर्षाच्या प्रतीक्षेनंतर शहराला पाणी पुरवठा करणारे दहेगाव धरणाची आता पूर्णत्वाकडे वाटचाल सुरु झाली आहे. त्रेहात्तर दशलक्ष घनफूल क्षमतेच्या या धरणात आता सत्तर टक्के एवढे जलसंचय झाले आहे पावसाचे सातत्य असेच सुरु राहिले. दहेगाव धरणाच्या सांडव्यातून पाण्याचा प्रवाहू मूळ नदी असलेल्या लेंडीनदीपात्रात पाणी वाहू लागणार आहे.

दहेगावच्या धरणाची पातळी दाखविणारे छायाचित्र आता केवळ पंधरा फूट पाण्याच्या संचयाची आवश्यकता असून ती झाली की लवकरच सांडव्यातून पाणी वाहू लागेल .
नांदगाव : तब्बल अकरा वर्षाच्या प्रतीक्षेनंतर शहराला पाणी पुरवठा करणारे दहेगाव धरणाची आता पूर्णत्वाकडे वाटचाल सुरु झाली आहे. त्रेहात्तर दशलक्ष घनफूल क्षमतेच्या या धरणात आता सत्तर टक्के एवढे जलसंचय झाले आहे पावसाचे सातत्य असेच सुरु राहिले. दहेगाव धरणाच्या सांडव्यातून पाण्याचा प्रवाहू मूळ नदी असलेल्या लेंडीनदीपात्रात पाणी वाहू लागणार आहे. यापूर्वी २००५ व २००९ मध्ये धरणाने पूर्ण क्षमता गाठली होती. धरणाच्या कार्यक्षेत्रात वरच्या बाजूला सोयगाव परिसरात तुलनेने ब?्यापैकी पडणा?्या पावसाने अशीच हजेरी ठेवली तर दहेगाव धरण भरण्यास मदत होणार आहे मात्र एकूणच शनिवारच्या पावसाने शहरवासीयांच्या अपेक्षा वाढीला लागल्या आहेत गेल्या अनेक वर्षांपासून दहेगाव धारण रिक्त राहत असल्याने सध्या गिरणा धारण योजनेतून शहराला पाणी पुरवठा होत आहे धारण भरल्याने पाणी वितरण व्यवस्थेसाठी ती पूरक बाबा ठरली आहे.