शिवराज्याभिषेक दिनानिमित्त दुग्धाभिषेक सोहळा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 12, 2018 00:53 IST2018-06-12T00:52:51+5:302018-06-12T00:53:32+5:30

येथील भैरवनाथ मंदिरात शिवराज्याभिषेक दिनानिमित्त छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास दुग्धाभिषेक घालण्यात आला.

Dagdhhebhishek ceremony on the occasion of Shivrajyabhishek din | शिवराज्याभिषेक दिनानिमित्त दुग्धाभिषेक सोहळा

शिवराज्याभिषेक दिनानिमित्त दुग्धाभिषेक सोहळा

देवळाली कॅम्प : येथील भैरवनाथ मंदिरात शिवराज्याभिषेक दिनानिमित्त छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास दुग्धाभिषेक घालण्यात आला.  शिवराज्याभिषेक दिनानिमित्त भैरवनाथ मंदिरात दत्तात्रय कुलकर्णी यांनी वेदघोषाच्या मंत्रोच्चार करत व्यापारी बँकेचे संचालक अरुण जाधव, जिजाऊ बचत गटाच्या गट संघटिका अनिता गोडसे,  पोपटराव हारक, ज्येष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष सीताराममुळाणे, हरिदास आडके, हनुमान गोडसे, संजय गोडसे, कैलास गोडसे, संतोष शिंदे, जय गोडसे, राजेश धुर्जड, सुनील चव्हाणके आदींच्या हस्ते दुग्धाभिषेक करण्यात आला.  यावेळी मंदिराच्या परिसरात वृक्षारोपणदेखील करण्यात  येऊन प्रसादाचे वाटपकरण्यात आले. यावेळी हरिश गोडसे, तेजस मोंढे, सागर गोडसे, तेजस शेळके, सुुधीर गायकवाड, नितीन जाधव, अनिल जाधव, निनाद धुर्जड, सचिन धुर्जड, प्रतीक गोडसे, कृष्णा थेटे, राहुल गोडसे आदी उपस्थित होते.  छत्रपती शिवाजी महाराज यांचा शिवराज्याभिषेक सोहळा दिन भगूरपुत्र स्वातंत्र्यवीर सावरकर समूहाच्या वतीने उत्साहात साजरा करण्यात आला. शिवराज्याभिषेक दिनानिमित्त शिवाजी चौकातील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास रामदास गाढवे व स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या पुतळ्यास संजय जाधव यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आला. यावेळी नीलेश हासे, मनोज कुवर यांनी केले. यावेळी समूहाचे रत्नाकर वाघचौरे, प्रशांत लोया, योगेश बुरके, पवन आंबेकर, प्रमोद आंबेकर, दिनेश बेरड, सुनील जोरे, प्रवीण वाघ, सचिन जंगम आदी उपस्थित होते.

Web Title: Dagdhhebhishek ceremony on the occasion of Shivrajyabhishek din

टॅग्स :Nashikनाशिक