सायकलस्वारांची पंढरपूर वारी
By Admin | Updated: July 28, 2015 01:37 IST2015-07-28T01:37:28+5:302015-07-28T01:37:53+5:30
२२२ सायकलपटू: महिला-मुलांचाही सहभाग लक्षवेधी

सायकलस्वारांची पंढरपूर वारी
नाशिक ते पंढरपूर मोहिम यशस्वीनाशिक : आषाढी एकादशीनिमित्त विठुरायाच्या भेटीसाठी दोनशे सायकलस्वारांनी नाशिकहून पंढरपूरची वारी केली. या वारीमध्ये शहरासह अन्य जिल्ह्यांमधील सायकलपटूंनीही स्वयंस्फूर्तीने सहभाग घेतला होता. सर्व सायकल वारकरी यशस्वीपणे वारी पूर्ण करून नाशकात परतले आहे.
नाशिक सायकलिस्ट असोसिएशनच्या वतीने दरवर्षीप्रमाणे यंदाही नाशिक ते पंढरपूर अशा ‘सायकल वारी’चे अध्यक्ष विशाल उगले यांनी आयोजन केले होते. महिला व मुलांचा लक्षवेधी सहभाग हे यंदाच्या वारीचे मुख्य आकर्षण ठरले होेते. गेल्या शुक्रवारी (दि.१७) सकाळी ६ वाजता महापौर अशोक मुर्तडक, पोलीस आयुक्त एस. जगन्नाथन यांनी हिरवा झेंडा दाखविला. अनंत कान्हेरे मैदान येथून सर्व सायकलस्वारांनी विठू नामाचा जयघोष करत पंढरपूरच्या दिशेने पॅडल मारले होते या सायकलवारीमध्ये नऊ वर्षीय मल्हार नवले, साहिल ठाकरे या मुलांसह ज्येष्ठ नागरिक अनंत चव्हाण आणि मनीषा भामरे (५३) यांनीही सायकलवारी यशस्वीपणे पूर्ण करत विठ्ठलाचे दर्शन घेतले. (प्रतिनिधी)