आत्मा मालिक विद्यालयात सांस्कृतिक कार्यक्र म उत्साहात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 2, 2020 05:48 PM2020-01-02T17:48:09+5:302020-01-02T17:48:45+5:30

जळगाव नेऊर : येथील आत्मा मालिक इंग्लिश मिडीयम गुरु कुल व ज्युनियर कॉलेजमध्ये जुन्या वर्षाला निरोप देत नवीन वर्षाच्या आनंदाची सुखद उधळण करण्यासाठी गुरु कुलात भजन स्पर्धेचे आयोजन केले होते. तसेच नृत्य व काव्यवाचन स्पर्धांचे देखील आयोजन केले होते.

Cultural program in the Spirit Spirit School | आत्मा मालिक विद्यालयात सांस्कृतिक कार्यक्र म उत्साहात

येवला तालुक्यातील पुरणगाव येथील आत्मा मालिक गुरु कुलात सांस्कृतिक कार्यक्र म प्रसंगी नृत्य सादर करताना विद्यार्थी.

googlenewsNext
ठळक मुद्दे पारंपरिक व नवीन भजनाच्या चालीवर एकूण २७५ विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदविला.

जळगाव नेऊर : येथील आत्मा मालिक इंग्लिश मिडीयम गुरु कुल व ज्युनियर कॉलेजमध्ये जुन्या वर्षाला निरोप देत नवीन वर्षाच्या आनंदाची सुखद उधळण करण्यासाठी गुरु कुलात भजन स्पर्धेचे आयोजन केले होते. तसेच नृत्य व काव्यवाचन स्पर्धांचे देखील आयोजन केले होते.
भजनस्पर्धेमध्ये गुरु कुलातील वगर््ानिहाय विद्याथ्यांनी एकूण ३४ भजने सादर केली. यात प्रामुख्याने पारंपरिक व नवीन भजनाच्या चालीवर एकूण २७५ विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदविला.
गुरु कुलाचे अध्यक्ष हनुमंत भोंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित स्पर्धेसाठी पुरणगाव संतपिठाचे संत सेवादास महाराज उपस्थित होते. कार्यक्र म यशस्वीतेसाठी गुरु कुलाचे दोन्ही विभागाचे प्राचार्य, संकुलप्रमुख कार्यालयीन अधीक्षक, वसतिगृह अधीक्षक, संगीत विभागाचे अंबादास शिंदे व श्याम शिंदे व शिक्षकवृंद आणि शिक्षकेतर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले. शितल महाले व रु पाली मोरे यांनी कार्यक्र माचे सूत्रसंचालन केले.

Web Title: Cultural program in the Spirit Spirit School

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.