कळवाडी भागात पिके करपली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 12, 2018 22:18 IST2018-08-12T22:16:38+5:302018-08-12T22:18:45+5:30

पावसाने दडी मारल्याने पाण्याअभावी मालेगाव तालुक्यातील कळवाडी परिसरातील उभी पिके करपु लागली आहेत. पावसाळ्याच्या सुरूवातीला का होईना पावसाने पेरणीपुरती हजेरी लावली होती. परंतु त्यानंतर पावसाने तब्बल महिनाभर दडी मारल्याने व रखरखीत ऊन पडू लागल्याने त्याचा पिकांना फटका बसला आहे.

 Cultivation of crops in Kalwadi areas | कळवाडी भागात पिके करपली

कळवाडी भागात पिके करपली

परिसरातील देवघट, हिसवळ, शेरुळ, पाडळदे, भिलकोट, दापुरे, साकुर, चिंचगव्हाण, उंबरदे, नरडाणे आदि गावांवर पावसाने डोळे वटारले आहेत. महागडी बियाणे, खते खरेदी करुन पेरणी केलेली खरीप पिके धोक्यात सापडल्याचे चित्र परिसरात दिसत आहे. पेरण्या झालेल्या क्षेत्रात पावसाचे दुर्भिक्ष्य त्यात कपाशीवर बोंड अळीचे संकट गर्दी करत आहे. बळीराजाला दमदार पावसाची अपेक्षा आहे. पावसाने तरी किडीचे प्रमाण कमी होईल अशी शेतकऱ्यांत चर्चा आहे. पावसाअभावी गुरांच्या चाºयाची समस्या निर्माण झाली आहे. शासनाने पेरण्या झालेल्या क्षेत्राची तातडीने पाहणी करुन पंचनामा करावा अशी मागणीदेखील शेतकºयांकडून होत आहे.

Web Title:  Cultivation of crops in Kalwadi areas

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.