भारतीय संस्कृती जोपासावी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 25, 2021 04:13 AM2021-09-25T04:13:21+5:302021-09-25T04:13:21+5:30

सिन्नर: भारतीय संस्कृती ही विश्वातील सर्वश्रेष्ठ संस्कृती आहे. या संस्कृतीला ऐतिहासिक, सामाजिक व धार्मिक आधार आहे. आपल्या संस्कृतीत संगीत, ...

Cultivate Indian culture | भारतीय संस्कृती जोपासावी

भारतीय संस्कृती जोपासावी

Next

सिन्नर: भारतीय संस्कृती ही विश्वातील सर्वश्रेष्ठ संस्कृती आहे. या संस्कृतीला ऐतिहासिक, सामाजिक व धार्मिक आधार आहे. आपल्या संस्कृतीत संगीत, वाद्य, कलाकृती, शिल्पकला, स्थापत्य कला आदींसह सर्वच क्षेत्रात उत्कृष्ट परंपरा आहे. येथील मातीच्या कणाकणात हा आविष्कार रुजलेला आहे. त्याची जोपासना व्हावी असे मत माध्यमिक लोकशिक्षण मंडळाचे अध्यक्ष अण्णासाहेब गडाख यांनी व्यक्त केले.

संस्थेच्या एस. जी. पब्लिक स्कूलच्या माध्यमिक विभागात साऊल क्रिएशनच्या माध्यमातून विद्यालयातील विद्यार्थ्यांनी साऊथ कोरियन भाषेमध्ये गीत रेकॉर्डिंग केले. यावेळी झालेल्या कार्यक्रमात ते बोलत होते. संस्था व्यवस्थापक अभिषेक गडाख यांच्या संकल्पनेतून झालेल्या या कार्यक्रमात साऊथ क्रिएशन यांनी विद्यालयातील विद्यार्थ्यांच्या आवाजात साऊथ कोरियन भाषेत गीत संगीतबद्ध केले. व्यासपीठावर विद्यालयाचे मुख्याध्यापक रघुनाथ एरंडे, रवींद्र सुपेकर, मंगेश गडाख, शुभम जोशी, सौरभ कुलकर्णी, चेतन गव्हाणे, रोहिणी शिंदे आदी उपस्थित होते. भारतीय संस्कृती गीताच्या स्वरूपात आणि सकारात्मक दृष्टिकोन देण्याच्या माध्यमातून साऊथ क्रिएशन संस्थेमार्फत सदर उपक्रम राबविला जात आहे. कोरियन भाषेचा भाग बनत विद्यार्थ्यांनी यावेळी आपल्या कौशल्याचे योगदान दिले. सदर प्रसंगी पर्यवेक्षक माधवराव शिंदे, चंद्रकला साळुंखे, विलास सातपुते, शिवाजी गाडेकर, बाळासाहेब काळोखे, अतुल पाटणे, प्रवीण सोमवंशी, रुपेश कुराडे, मनोज सोनवणे, बाळू धूम, राजू कांबळे, राजाराम सोनवणे, गणेश तिडके, बाबासाहेब सुडके, नवनाथ हासळे, पुष्पा जाधव, प्राची कटके, प्रमिला चिने, शीतल चिने आदींसह कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते.

------------------

सिन्नर तालुक्यातील एस. जी. पब्लिक स्कूलमध्ये साऊथ क्रिएशन कार्यक्रमाप्रसंगी मार्गदर्शन करतांना अण्णासाहेब गडाख. समवेत अभिषेक गडाख, रघुनाथ एरंडे, रवींद्र सुपेकर, मंगेश गडाख, शुभम जोशी, सौरभ कुलकर्णी, चेतन गव्हाणे, रोहिणी शिंदे आदी. (२४ सिन्नर गडाख)

240921\24nsk_10_24092021_13.jpg

२४ सिन्नर गडाख

Web Title: Cultivate Indian culture

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.