वादळीवाऱ्याने रस्ते, आखाड्यांची दुर्दशा

By Admin | Updated: July 28, 2015 00:36 IST2015-07-28T00:24:21+5:302015-07-28T00:36:14+5:30

त्र्यंबकेश्वर : सिंहस्थासाठी बांधलेली शेड वाऱ्याने उडाले, खांब वाकले

Crowds of roads, asteroid plight | वादळीवाऱ्याने रस्ते, आखाड्यांची दुर्दशा

वादळीवाऱ्याने रस्ते, आखाड्यांची दुर्दशा

त्र्यंबकेश्वर : येथे गेल्या दोन दिवसांपासून येथे जोरदार वारे वाहत असून, पाऊसही पडत आहे. रविवारी रात्रभर व पहाटे येथील नगरपालिकेच्या वाहनतळावरील यात्रिकांसाठी टेंपररी शेडचे बांधकाम सध्या सुरू आहे. या शेडचे पत्रे वाऱ्यामुळे उडून चहूकडे सर्वत्र विखुरले. उत्तररात्र असल्यामुळे त्या परिसरात कोणी नव्हते सुदैवाने कोणी जखमी झाले नाही.
सध्या त्र्यंबकला नंतर मंजूर झालेल्या पक्क्या व टेंपररी शेडसची बांधकामे वेगात सुरू आहेत. तथापि पक्क्या शेडसचे बांधकामे व त्यावरील पत्रे टाकण्याचे काम अद्याप बाकी आहे. तर टेंपररी श्ेडस बांधकामे व पत्रे टाकण्याचे कामे बाकी आहेत. परिणामी रात्री वाहनतळावर यात्रिकांसाठी बांधलेल्या शेडसचे पत्रे टाकण्याचे काम सुरू होते. पत्रे उडून विद्युत तारांवर पडले. तसेच या भागातील विद्युत पोल अक्षरश: वाकले.
विशेष म्हणजे ऐन पर्वणी काळात असे जोरदार वारे सुटले, पाऊस पडू लागला तर यात्रेकरूंचे काय हाल होतील याची कल्पनाच करवत नाही. सध्या असेच टेंपररी शेड विविध आखाड्याते आश्रमात बांधकामे सुरू आहेत. दरम्यान रात्री या परिसरातील विद्युत सप्लाय खंडीत झाल्याचे समजताच विद्युत कर्मचारी त्या भागात पोहचले मात्र पत्रे उडाल्याने कर्मचाऱ्यांची धावपळ झाली. अशा परिस्थितीत विद्युत कर्मचाऱ्यांनी तुटलेल्या तारा खांबापासून मोकळ््या केल्या. या पावसामुळे पिंपळद येथील जुना आखाड्याकडे जाणाऱ्या नवीन रस्त्याचे निकृष्ट काम पहिल्याच पावसाने उखडून गेले. रस्त्याला तडे जाऊन रस्ता अक्षरश: ठिकठिकाणी तुटला आहे. सदर ठिकाणी काँक्रिट अथवा पेल्व्हर ब्लॉक न बसविल्याने संपूर्ण चिखलाचे साम्राज्य पसरले आहे. केलेला रस्ताही अर्धवट सोडून देण्यात आला आहे. अजूनही या भागात मोठे मोठे खडीचे ढीग पडले आहेत. जुना आखाड्याचे महामंत्री हरिगिरी यांनी बाहेरगावला गेल्यामुळे ते आपल्या आखाड्याकडे गेलेले नाही.
(वार्ताहर)

Web Title: Crowds of roads, asteroid plight

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.