शहरं
Join us  
Trending Stories
1
शांतीगिरी महाराजांनी शिवसेनेच्या नावाने उमेदवारी अर्ज भरला; भुजबळांची पहिली प्रतिक्रिया
2
'त्यांना कशाला घेता, आम्हीच तुमच्यासोबत येतो; उद्धव ठाकरेंचा दिल्लीला फोन'; शिंदेंचा गौप्यस्फोट
3
"माझं एक लग्न पंतप्रधान मोदींमुळे मोडलं..."! पाकिस्तानातील मुफ्तीचा दावा, व्हिडिओ व्हायरल
4
तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंथ रेड्डींना पोलिसांनी थेट दिल्लीला बोलवले, सोबत फोनही घेऊन येण्याच्या सूचना
5
'निवडणूक आयोगाला आम्ही आदेश देऊ शकत नाही'; हायकोर्टाने फेटाळली मोंदींविरोधातील याचिका
6
Vastu Shastra: कणभर मोहरीचे मणभर फायदे; घराच्या प्रवेश द्वाराशी मोहरी ठेवा आणि वास्तु दोष घालवा!
7
तिहार जेलमधून अरविंद केजरीवाल यांची महिलांसाठी मोठी घोषणा; आतिशी यांनी दिला मेसेज
8
उदयनराजे म्हणाले, संकेत समजून घ्या! कॉलर उडवून शरद पवार सांगत आहेत की...
9
४ मे! राणेंसाठी राज ठाकरे कणकवलीत येणार; तिथेच काही वर्षांपूर्वी राज यांची कार माघारी फिरलेली
10
ठाकरेंचे 13 पैकी 5-6 आमदार शिंदेंच्या संपर्कात, खासदारही; फसलेल्या सभेवरून उदय सामंतांचा दावा
11
अमेठीमध्ये बसपाने उतरवला उमेदवार? भाजपा की काँग्रेस, कुणाचं गणित बिघडवणार?  
12
PHOTOS: IPS पदाचा राजीनामा देऊन लोकसभेच्या 'रिंगणात', सामाजिक कार्यासाठी मैदानात!
13
भाजपाकडून उज्ज्वल निकम उमेदवार; प्रकाश आंबेडकर म्हणाले, “व्यक्ती म्हणून आक्षेप...”
14
Akshaya Tritiya 2024: अक्षय्य तृतीयेच्या दिवशी लावा नवीन तुळस; होतील अगणित फायदे!
15
'महाराष्ट्राची हास्यजत्रा' फेम शिवाली परबची गगनभरारी, अभिनेत्रीने खरेदी केलं हक्काचं घर
16
Ana Brumwell Photos: कोण आहे RCBचा शतकवीर Will Jacksची गर्लफ्रेंड अ‍ॅना ब्रुमवेल? जाणून घ्या या सौंदर्यवतीबद्दल
17
फडणवीसांच्या भेटीनंतर अभिजीत पाटलांचं ठरलं?; सूचक वक्तव्याने चर्चांना उधाण
18
“तुम्ही मतांचा पाऊस पाडा, मी विकासाचा पाऊस पाडल्याशिवाय राहणार नाही”: पंकजा मुंडे
19
अभिनेता लोकसभेच्या रिंगणात; चाहत्याची सेल्फी अन् झाले मोठे नुकसान, पिकला एकच हशा
20
खळबळजनक! लग्नानंतर 4 दिवसांनी नवरीचा मृत्यू; बाथरूममध्ये सापडला मृतदेह अन्...

सिन्नरला बिले कमी करण्यासाठी वीज कार्यालयात ग्राहकांची झुंबड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 30, 2020 10:32 PM

सिन्नर : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सुमारे तीन महिने संपूर्ण देशभर लॉकडाऊन करण्यात आल्यानंतर सर्वसामान्य जनतेचे उत्पन्नाचे स्रोत पूर्णपणे बंद झाले, छोटे-मोठे व्यवसाय, दुकाने बंद असल्याने अर्थचक्र ठप्प झाले. शासनाने लॉकडाऊन शिथिल केल्यानंतर रोजीरोटीला लागलेल्या सर्वसामान्यांना वीज वितरण कंपनीने अव्वाच्या सव्वा वीजबिलांची भेट देऊन झटका दिला.

ठळक मुद्देअर्थचक्र ठप्प : लॉकडाऊननंतर बिल रकमेचा ‘जोर का झटका’; व्यावसायिक अडचणीत

लोकमत न्यूज नेटवर्कसिन्नर : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सुमारे तीन महिने संपूर्ण देशभर लॉकडाऊन करण्यात आल्यानंतर सर्वसामान्य जनतेचे उत्पन्नाचे स्रोत पूर्णपणे बंद झाले, छोटे-मोठे व्यवसाय, दुकाने बंद असल्याने अर्थचक्र ठप्प झाले. शासनाने लॉकडाऊन शिथिल केल्यानंतर रोजीरोटीला लागलेल्या सर्वसामान्यांना वीज वितरण कंपनीने अव्वाच्या सव्वा वीजबिलांची भेट देऊन झटका दिला.लॉकडाउन काळात सरासरी वीजबिले देणाऱ्या वीज वितरण कंपनीने लॉकडाऊननंतर सर्वसामान्यांना चार ते पाच पटीने अधिक रक्कमेची बिले पाठविल्याने ग्राहक त्रस्त झाले असून, बिले कमी करण्यासाठी ग्राहकांनी वीज वितरणच्या आडवा फाटा येथील कार्यालयावर गर्दी केली होती.लॉकडाऊनमुळे छोटे-मोठे व्यावसायिक, नोकरदार, कामगार, मोलमजुरी करून उदर निर्वाह करणारे लॉकडाऊनमध्ये दुकाने बंद असतानाही या काळातील वाढीव वीजबिलांमुळे व्यावसायिक अधिकच अडचणीत आले आहेत.लॉकडाऊन काळात त्यांच्या नियमित वीजबिलापेक्षा चार पाच पट अधिकची बिले आली आहेत. अनेक ग्राहकांनी लॉकडाऊन काळात आॅनलाइन पद्धतीने वीजबिले भरूनही अव्वाच्या सव्वा बिलं पाठविण्यात आली. लॉकडाऊन काळात आर्थिकचा सामना करावा लागत आहे. वितरणने पाठवलेले वाढीव वीज देयके आल्यानंतर नागरिकांमध्ये असंतोष निर्माण झाला असून, सदर बिले चौकशीसाठी वीज वितरण कंपनीच्या कार्यालयात घेऊन गेले असता अधिकाऱ्यांनी अरेरावीची भाषा वापरत अपमानास्पद वागणूक दिल्याची अनेक ग्राहकांनी तक्रार केली आहे. बिल पाहून ग्राहक अवाक्...एरवी ८०० ते १००० रुपये दरमहा वीजबिल भरणाºया ग्राहकांना २० हजारांचे बिल पाठवून महावितरण कंपनीने अजब कारभाराचा गहजब नमुनाच पेश केला आहे. शहरातील सुमनबाई अर्जुन खैरे या महिलेला जून महिन्यात तब्बल २० हजार ७७० रुपये वीजबिल आले. यापूर्वी सरासरी १००० रुपये बिल येत होते.लॉकडाऊनच्या काळात एवढे काय झाले की, बिल एकदम २० हजार पार गेले. याशिवाय सरासरी ५०० ते ५५० रुपये दरमहा वीजबिल भरणाºया ग्राहकास जूून महिन्याचे ५ ते ६ हजार रुपये बिल आल्याने या ग्राहकांचे डोळे विस्फारले आहेत. एखाद-दुसºया ग्राहकाच्या बाबतीत चूक होऊ शकते मात्र शहरासह तालुक्यातील अनेक ग्राहकांच्या बाबतीत हाच प्रकार घडल्याने महावितरणच्या कार्यालयासमोर बिले कमी करण्यासाठी ग्राहकांची दररोज गर्दी होत आहे. अधिक देयके आल्यानंतर नागरिकांमध्ये असंतोष निर्माण झाला आहे.सामान्यांचे हाललॉकडाऊन काळात शेतकरी, कामगार, शेतमजूर व सर्वसामान्य नागरिकांचे राज्य शासनाने रोजगार व उत्पादनाचे कुठलेही नियोजन केले नसल्याने सर्वांना उपासमारीला सामोरे जावे लागले आहे.या काळात सर्वसामान्य नागरिकांचा रोजगार बुडाल्यामुळे आर्थिक संकटाचा सामना करावा लागला. हे सर्व घडत असतानाच महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनीने व्यवसाय करणारे दुकाने बंद आहेत.बंदकाळात विजेचा कोणताही वापर झालेला नसताना अंदाजे मीटर रीडिंग दाखवून एकत्रित तीन महिन्यांचे बिले काढून व्यावसायिक व घरगुती ग्राहकांना वीज वितरणकंपनीने मानसिक व आर्थिकदृष्ट्या त्रास देण्याचे काम सुरू केले आहे. अर्थचक्र ठप्प : लॉकडाऊननंतर बिल रकमेचा ‘जोर का झटका’; व्यावसायिक अडचणीतसिन्नरला बिले कमी करण्यासाठी वीज कार्यालयात ग्राहकांची झुंबड लोकमत न्यूज नेटवर्कसिन्नर : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सुमारे तीन महिने संपूर्ण देशभर लॉकडाऊन करण्यात आल्यानंतर सर्वसामान्य जनतेचे उत्पन्नाचे स्रोत पूर्णपणे बंद झाले, छोटे-मोठे व्यवसाय, दुकाने बंद असल्याने अर्थचक्र ठप्प झाले. शासनाने लॉकडाऊन शिथिल केल्यानंतर रोजीरोटीला लागलेल्या सर्वसामान्यांना वीज वितरण कंपनीने अव्वाच्या सव्वा वीजबिलांची भेट देऊन झटका दिला.लॉकडाउन काळात सरासरी वीजबिले देणाºया वीज वितरण कंपनीने लॉकडाऊननंतर सर्वसामान्यांना चार ते पाच पटीने अधिक रक्कमेची बिले पाठविल्याने ग्राहक त्रस्त झाले असून, बिले कमी करण्यासाठी ग्राहकांनी वीज वितरणच्या आडवा फाटा येथील कार्यालयावर गर्दी केली होती.लॉकडाऊनमुळे छोटे-मोठे व्यावसायिक, नोकरदार, कामगार, मोलमजुरी करून उदर निर्वाह करणारे लॉकडाऊनमध्ये दुकाने बंद असतानाही या काळातील वाढीव वीजबिलांमुळे व्यावसायिक अधिकच अडचणीत आले आहेत.लॉकडाऊन काळात त्यांच्या नियमित वीजबिलापेक्षा चार पाच पट अधिकची बिले आली आहेत. अनेक ग्राहकांनी लॉकडाऊन काळात आॅनलाइन पद्धतीने वीजबिले भरूनही अव्वाच्या सव्वा बिलं पाठविण्यात आली. लॉकडाऊन काळात आर्थिकचा सामना करावा लागत आहे. वितरणने पाठवलेले वाढीव वीज देयके आल्यानंतर नागरिकांमध्ये असंतोष निर्माण झाला असून, सदर बिले चौकशीसाठी वीज वितरण कंपनीच्या कार्यालयात घेऊन गेले असता अधिकाºयांनी अरेरावीची भाषा वापरत अपमानास्पद वागणूक दिल्याची अनेक ग्राहकांनी तक्रार केली आहे. बिल पाहून ग्राहक अवाक्...एरवी ८०० ते १००० रुपये दरमहा वीजबिल भरणाºया ग्राहकांना २० हजारांचे बिल पाठवून महावितरण कंपनीने अजब कारभाराचा गहजब नमुनाच पेश केला आहे. शहरातील सुमनबाई अर्जुन खैरे या महिलेला जून महिन्यात तब्बल २० हजार ७७० रुपये वीजबिल आले. यापूर्वी सरासरी १००० रुपये बिल येत होते.लॉकडाऊनच्या काळात एवढे काय झाले की, बिल एकदम २० हजार पार गेले. याशिवाय सरासरी ५०० ते ५५० रुपये दरमहा वीजबिल भरणाºया ग्राहकास जूून महिन्याचे ५ ते ६ हजार रुपये बिल आल्याने या ग्राहकांचे डोळे विस्फारले आहेत. एखाद-दुसºया ग्राहकाच्या बाबतीत चूक होऊ शकते मात्र शहरासह तालुक्यातील अनेक ग्राहकांच्या बाबतीत हाच प्रकार घडल्याने महावितरणच्या कार्यालयासमोर बिले कमी करण्यासाठी ग्राहकांची दररोज गर्दी होत आहे. अधिक देयके आल्यानंतर नागरिकांमध्ये असंतोष निर्माण झाला आहे.सामान्यांचे हाललॉकडाऊन काळात शेतकरी, कामगार, शेतमजूर व सर्वसामान्य नागरिकांचे राज्य शासनाने रोजगार व उत्पादनाचे कुठलेही नियोजन केले नसल्याने सर्वांना उपासमारीला सामोरे जावे लागले आहे.या काळात सर्वसामान्य नागरिकांचा रोजगार बुडाल्यामुळे आर्थिक संकटाचा सामना करावा लागला. हे सर्व घडत असतानाच महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनीने व्यवसाय करणारे दुकाने बंद आहेत.बंदकाळात विजेचा कोणताही वापर झालेला नसताना अंदाजे मीटर रीडिंग दाखवून एकत्रित तीन महिन्यांचे बिले काढून व्यावसायिक व घरगुती ग्राहकांना वीज वितरण कंपनीने मानसिक व आर्थिकदृष्ट्या त्रास देण्याचे काम सुरू केले आहे.

टॅग्स :sinnar-acसिन्नरelectricityवीज