नांदगाव बाजारपेठेत गर्दी, नियमांचे उल्लंघन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 25, 2021 15:14 IST2021-05-25T15:14:14+5:302021-05-25T15:14:28+5:30
नांदगाव : कोरोना विषयीच्या नियमावलींचे पालन होत नसल्याच्या तक्रारी अजूनही सुरूच आहेत.

नांदगाव बाजारपेठेत गर्दी, नियमांचे उल्लंघन
नांदगाव : कोरोना विषयीच्या नियमावलींचे पालन होत नसल्याच्या तक्रारी अजूनही सुरूच आहेत. दुकानदार व नागरिक ऐकायला तयार नाहीत व प्रशासकीय दुर्लक्षामुळे आलेल्या मर्यादा अशा कारणांमुळे लॉकडाऊन कागदावर उरला आहे. लॉकडाऊन काळात सोमवार ते शुक्रवार सकाळी ७ ते ११ पर्यंत व्यापारी पेठ खुली असते. तिच्यात नियमांची पायमल्ली मिनिटा मिनिटाला होत असते. आठवडे बाजार अधिकृतरीत्या रद्द करण्यात आला असला तरी भोंगळे रोड वरची गर्दी चिंता वाढविणारी असते. लॉकडाऊन काळात शहरात बाजारपेठ सकाळी ७ ते ११ वा पर्यंत खुली असते. या काळात सर्वच प्रकारची दुकाने खुली असतात तर अत्यावश्यक सेवा २४ तास सुरु असतात. भाजीबाजार उशिरापर्यंत सुरु असतो, शिवाय बरेच व्यावसायिक चोरी छुपे अर्धे शटर उघडून आपले व्यवसाय सुरु ठेवतात.