शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! RBI कडून पेटीएमचा बँकिंग परवाना कायमचा रद्द; युजर्सवर काय परिणाम होणार...
2
इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांना कर्करोग! खुद्द स्वतःच केला धक्कादायक खुलासा; आता कशी आहे तब्येत?
3
आप फुटली, भाजपाची ताकद वाढली! राज्यसभेत आता कोणत्या पक्षाचे किती खासदार?
4
'आप'ला भगदाड, खासदारांचा मोठा गट फुटला! अरविंद केजरीवाल म्हणाले, "भाजपाने पुन्हा..."
5
नेपाळमध्ये भारतीय भाविकांच्या बसला अपघात; २१ जण जखमी, ६ वर्षांच्या चिमुरडीसह एका महिलेचा मृत्यू
6
तरुणीला 'हाय' केले अन् वाद पेटला; लग्नातील वऱ्हाडी थेट २० फूट खड्ड्यात, एकाचा मृत्यू ८ जण जखमी, विकासकाविरुद्ध गुन्हा 
7
Latest Marathi News LIVE Updates: आम आदमी पक्षाला मोठा धक्का; राज्यसभेचे ७ खासदार फुटले, भाजपात प्रवेश करणार
8
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमारांना हटवण्याची मागणी; ७३ खासदारांचे सभापतींना पत्र
9
९०% मार्क्स, आयआरएससोबत वडिलांची ओळख अन् लक्झरी लाईफचं वेड; हुशार राहुल मीणा गुन्हेगार कसा झाला?
10
Raghav Chadha: राघव चड्ढा, हरभजनसिंग भाजपात! आम आदमी पार्टीत उभी फूट, राज्यसभेच्या १० पैकी ७ खासदारांचा पक्षाला 'राम-राम'
11
Raghav Chadha : राघव चड्ढांनी २१ दिवसांपूर्वीच दिले होते 'आप'मधील फुटीचे संकेत; भाकीत ठरलं खरं
12
“रिक्षा-टॅक्सी, ओला-उबेर, रॅपिडो चालकांनी मराठीत संवाद साधलाच पाहिजे”: मंत्री प्रताप सरनाईक
13
एकदम फिट दिसणाऱ्यांना का येतोय हार्ट अटॅक? डॉक्टरांनी सांगितलं 'ते' खरं कारण
14
'नरक' म्हणणाऱ्या डोनाल्ड ट्रम्प यांना चीनचे भारताचा झेंडा पोस्ट करत उत्तर; 'शब्द विरून जातात, पण...'
15
LPG Subsidy : तुमच्या सिलिंडरचं अनुदान खात्यात जमा होतंय का? घरबसल्या स्टेटस तपासण्याची सोपी पद्धत
16
दमदार इंजिनसह BMW ने भारतात लॉन्च केली सर्वात स्वस्त बाईक, जाणून घ्या किंमत अन् फीचर्स...
17
इन्स्टाग्राम युजर्सना मोठा धक्का! रंगीत फोटो झाले काळे-पांढरे; मिनिटांत करा दुरुस्त, फॉलो करा या सोप्या स्टेप्स
18
"मी त्याच्याशीच लग्न करणार...", बिग बॉस विजेती तन्वी कोलतेने केला खुलासा; प्रेमाबद्दल म्हणाली...
19
राजकारणात येण्यापूर्वी काय करायचे राघव चड्ढा; आपने ग्लॅमरस मोहरा गमावला... 
20
सावधान! फळ आणि भाज्या खाल्ल्याने वाढतोय कॅन्सरचा धोका? नव्या रिसर्चने सर्वच हादरले
Daily Top 2Weekly Top 5

नियोजन बैठकांमध्ये सर्वपक्षीय मराठा नेत्यांची गर्दी

By admin | Updated: September 10, 2016 00:36 IST

कळवण : १७ सप्टेंबरला नियोजनासाठी बैठकीचे आयोजन

 कळवण : कोपर्डी येथील अल्पवयीन मुलीवर झालेल्या अत्याचाराच्या घटनेचा निषेध नोंदविण्यासाठी तसेच मराठा समाजाला आरक्षण द्यावे व अ‍ॅक्ट्रॉसिटी कायदा रद्द करावा, यासाठी जिल्ह्यातील मराठा समाजाच्या वतीने नाशिक येथे काढण्यात येणाऱ्या मोर्चाचे नियोजन करण्यासाठी कळवण येथे बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. बैठकीस तालुक्यातील सर्वपक्षीय मराठा नेत्यांची गर्दी दिसून आली. दि. २४ सप्टेंबर रोजी नाशिक येथे आयोजित मराठा क्रांती मूक मोर्चात सर्वांनी सहभागी होण्याचा निर्धार बैठकीत करण्यात आला. दि. १७ सप्टेंबर रोजी कळवणला पुन्हा नियोजन बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे. इतर समाजाप्रमाणे मराठा समाजाला आरक्षण देणे गरजेचे असून, या मागणीसाठी मोर्चा काढण्यात येणार आहे. कोपर्डीसारखी घटना पुन्हा घडू नये व मराठा समाजावर अन्याय होऊ नये यासाठी मराठा समाजाने एकत्रित येणे गरजेचे असल्याचे मत जिल्हा परिषदेचे सदस्य रवींद्र देवरे, भाजपाचे माजी जिल्हाध्यक्ष विकास देशमुख, उध्दव आहेर, राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष राजेंद्र भामरे, भाजपाचे तालुकाध्यक्ष सुधाकर पगार, मविप्रचे माजी उपसभापती विजय पवार आदिंनी बैठकीत व्यक्त केले.कळवण तालुक्यातील गावागावांतून मराठा समाजबांधव नियोजन बैठकीला उपस्थित होते. कळवण, अभोणा, नवी बेज, निवाणे, भुसणी, बेलबारे, मानूर, गोसराणे, भगुर्डी, मोहमुख, भादवण, विसापूर, ककाणे, खेडगाव, बिजोरे, कळवण खुर्द, भेंडी, बगडू, पिळकोस, साकोरे, कळमथे, शिरसमणी, वाडी ,एकलहरे, नाकोडे, देसराणे, मोकभणगी, रवळजी आदि गावांतील मराठा बांधवांना नाशिक येथील मराठा मूक मोर्चासाठी खासगी वाहनांद्वारे घेऊन जाण्यासाठी नियोजन केले जात असल्याची माहिती शिवसेनेचे जिल्हाप्रमुख कारभारी आहेर, शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष देवीदास पवार, बेलबारे येथील प्रगतिशील शेतकरी मधुकर भदाणे, भेंडीचे प्रमोद रौंदळ, पंकज रौंदळ, अभोण्याचे आबा सूर्यवंशी, भुसणीचे विष्णू सोनवणे, गोसराण्याचे सिकंदर मोरे, कळवण सोसायटीचे माजी सभापती शंकरराव निकम, बगडूचे रामा पाटील यांनी यावेळी बैठकीत दिली. जास्तीतजास्त समाजबांधवांना नाशिक येथील मोर्चात सहभागी करण्याचा निर्धार करण्यात आला. प्रास्ताविक राजेंद्र भामरे यांनी, तर सूत्रसंचालन राकेश हिरे यांनी केले. (वार्ताहर)