लासलगावी पावसामुळे पिकांना फटका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 7, 2021 01:00 IST2021-05-06T23:15:40+5:302021-05-07T01:00:45+5:30
लासलगाव : गुरुवारी सायंकाळी ६ वाजेच्या सुमारास लासलगावसह परिसरात विजेच्या कडकडाटासह अवकाळी पावसाने जोरदार हजेरी लावल्याने कांद्यासह शेतपिकांना मोठा फटका बसला आहे. त्यामुळे कांदा उत्पादक शेतकरी पुन्हा अडचणीत सापडला आहे.

लासलगावी पावसामुळे पिकांना फटका
ठळक मुद्देदिवसभर ढगाळ वातावरण व हवेत कमालीचा उकाडा
लासलगाव : गुरुवारी सायंकाळी ६ वाजेच्या सुमारास लासलगावसह परिसरात विजेच्या कडकडाटासह अवकाळी पावसाने जोरदार हजेरी लावल्याने कांद्यासह शेतपिकांना मोठा फटका बसला आहे. त्यामुळे कांदा उत्पादक शेतकरी पुन्हा अडचणीत सापडला आहे.
दिवसभर ढगाळ वातावरण व हवेत कमालीचा उकाडा जाणवत होता. संध्याकाळच्या सुमारास वातावरणात अचानक बदल होऊन लासलगावसह परिसरातील गावात विजेच्या कडकडाटासह अवकाळी पावसाने जोरदार हजेरी लावली. दुपारपर्यंत कडक ऊन होते. अचानक आलेल्या पावसाने बळीराजाने काढलेला शेतमाल झाकण्यासाठी एकच धावपळ उडाली.