शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धव ठाकरेंना मोठा धक्का, नाशिकमध्ये खिंडार; एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेची ताकद वाढली
2
राहुल गांधी रायबरेलीत का पोहोचले? अमेठी का सोडली...
3
जी भाषा पाकिस्तान करतेय तीच भाषा काँग्रेस का करतेय?; BJP नेते आशिष शेलारांचा सवाल
4
मित्रपक्षांमुळे भाजपला ‘४०० पार’ची चिंता; सर्वाधिक काळजी महाराष्ट्रात
5
आजचे राशीभविष्य, ६ मे २०२४ : मेषसाठी काळजीचा अन् वृषभसाठी आनंदाचा दिवस
6
धुरळा शांत; तिसऱ्या टप्प्याचे उद्या मतदान; आरोप-प्रत्यारोपांनी गाजला रणसंग्राम
7
तापमानाने जिवाची काहिली; सोलापूर, अकोला सर्वाधिक उष्ण; मुंबईत उकाडा कायम
8
नीट-पीजीची परीक्षा आता विभागनिहाय; ऐन वेळी रचनेत बदल करण्याच्या निर्णयामुळे विद्यार्थी नाराज
9
निवडणुकीसाठी विक्रमी खर्च; ग्रामीण अर्थव्यवस्थेला बूस्ट; १.३५ लाख कोटींची उलाढाल
10
चला... सातारा, सांगली, कोल्हापूर, रायगड, रत्नागिरी; गाड्या फुल्ल : मतदानासाठी चाकरमानी निघाले गावाकडे 
11
ठाण्यावर मालकी हक्क सांगणाऱ्यांची मस्ती उतरवणार; सीमेवरील जवानही असुरक्षित - उद्धव ठाकरे
12
सरशी कोणाची? शिंदेगटाची की उद्धवसेनेची?
13
नसीम खान यांची नाराजी काँग्रेसने कशी दूर केली?
14
राजकीय पक्षांना देणगी देणाऱ्या मेघा इंजिनीअरिंगच्या उपकंपनीसाठी नागपूर महानगरपालिका मेहेरबान
15
नोकऱ्या देणाऱ्यांना मदत करणाऱ्यांचे हात आखडते; २०२३ मध्ये केवळ एका स्टार्टअपला युनिकॉर्नचा दर्जा
16
२ वर्षांपूर्वी मिळाला पद्मश्री, आता करावी लागतेय मजुरी
17
वाळू माफियांनी एएसआयला चिरडले; अंगावर टॅक्टर घातल्याने झाला मृत्यू 
18
मुलाच्या ‘बर्थ डे’साठी घरी निघाला होता शहीद जवान; मृत्यूचा बदला घेण्यासाठी दहशतवाद्यांचा कसून शोध सुरू
19
सरन्यायाधीशांना झाली होती शिक्षा; स्वत: सांगितला किस्सा
20
तंत्रज्ञानाचा वापर खेळासाठी चांगला; भारताच्या पहिल्या महिला कसोटी पंचाचे मत

येवला तालुक्‍यात १६ हजार हेक्टरवरील पिकांना फटका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 29, 2020 8:55 PM

जळगाव नेऊर : येवला तालुक्यात सप्टेंबर महिन्यात झालेल्या अवकाळी पावसाने तालुक्यातील १२४ गावातील तब्बल ३५ हजार शेतकऱ्यांच्या १६ हजार ८५७ हेक्टरवरील पिकांना फटका बसला असुन यातील ३३ टक्क्यांवर नुकसानीचे पंचनामे पूर्ण झाले असुन सुमारे २० कोटी १२ लाखांचे नुकसानीचे पंचनामे पूर्ण करण्यात आहेत.

ठळक मुद्देप़ंचनामे पुर्ण .....३५ हजार शेतकऱ्यांची उभी पिके खराब

जळगाव नेऊर : येवला तालुक्यात सप्टेंबर महिन्यात झालेल्या अवकाळी पावसाने तालुक्यातील १२४ गावातीलतब्बल ३५ हजार शेतकऱ्यांच्या १६ हजार ८५७ हेक्टरवरील पिकांना फटका बसला असुन यातील ३३ टक्क्यांवर नुकसानीचे पंचनामे पूर्ण झाले असुन सुमारे २० कोटी १२ लाखांचे नुकसानीचे पंचनामे पूर्ण करण्यात आहेत                    पंचनामे झालेल्या पिकांमध्ये बाजरी २.१० तर, कापसाचे एक हजार ४९०हेक्टर,मका दोन हजार ३२८, भुईमुग ३.६० हेक्टर, तर सोयाबीनचे १११.९७ हेक्टर तर तीन हजार ९३६ हेक्टरवर जिरायती पिकांखालील नुकसान झाले असून,याचा फटका आठ हजार ३६० शेतकऱ्यांना तब्बल दोन कोटी ६७ लाख रुपयांना बसला आहे.         येवला तालुक्यात मोठ्या प्रमाणात कांदा लागवड झाल्याने सर्वाधीक नुकसान झाले असून, पंचनाम्यांनुसार २६ हजार ६४४ शेतकऱ्यांचे तब्बल १२ हजार ९१४ हेक्टरवरील कांद्याचे पंचनाम्यानुसार नुकसान झाले आहे तर १.८०हेक्टरवर भाजीपाल्याचे नुकसान होऊन कांदा आणि भाजीपाला मिळुन १७ कोटि ४३ नुकसान पंचनाम्यानुसार झाले आहे. तर फळपिकामध्ये अ‍ॅपल बोर २.४०, तर द्राक्षाचे १.८० असे दोन्ही मिळुन ४.२० हेक्टरवरील चार शेतकऱ्यांचे नुकसान झाले असुन शासनाकडून काय मदत मिळते याकडे शेतकर्या़ंचे लक्ष लागून आहे.            येवला तालुक्यात पिक पंचनामे पुर्ण करण्यात आले असुन , माहिती जिल्हाधिकारी कार्यालयाला कळविण्यात आली असून अनुदान प्राप्त होताच शेतकऱ्यांना वाटप करण्यात येईल.- प्रमोद हिले, तहसीलदार येवला.मी साडेतीन एकरावर पोळ कांदा लागवड केली होती पण मुसळधार पावसाने व बुरशीजन्य रोगाने कांद्याचे पीक पूर्णपणे उद्ध्वस्त झाले त्यामुळे मोठ्या प्रमाणात खर्च होऊन आर्थिक नुकसान सोसावे लागले .शासनाने मदतीचा हात पुढे करून लवकरात लवकर मदत घ्यावी.- खंडेराव चव्हाणके ,जळगाव नेऊर. 

टॅग्स :Rainपाऊसagricultureशेती