तुरूंग अधिकाऱ्यावर हल्लाप्रकरणी गुन्हा दाखल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 20, 2018 00:24 IST2018-10-20T00:24:10+5:302018-10-20T00:24:51+5:30
नाशिकरोड मध्यवर्ती कारागृहात कैद्याने तुरुंग अधिकाºयावर दगडाने हल्ला करून रक्तबंबाळ करत जखमी केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

तुरूंग अधिकाऱ्यावर हल्लाप्रकरणी गुन्हा दाखल
नाशिकरोड : नाशिकरोड मध्यवर्ती कारागृहात कैद्याने तुरुंग अधिकाºयावर दगडाने हल्ला करून रक्तबंबाळ करत जखमी केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तुरुंगाधिकारी प्रवीण विश्वनाथ विभांडिक यांनी दिलेल्या फिर्यादित म्हटले आहे की, कारागृहरक्षक विलास पाटील यांच्यासह कारागृहात संचारफेरी केल्यानंतर दवाखाना विभागाच्या मुख्य दरवाजाजवळ उभा होतो. यावेळी कैदी सचिन कन्हैया चावरे याने विभांडिक यांना तुरुंगाधिकारी संपत आढे कुठे आहे, अशी विचारणा केली. विभांडिक यांनी माहिती नसल्याचे सांगितल्याने संतप्त झालेल्या कैदी सचिन चावरे याने खिशातून दगड काढून विभांडिक यांच्यावर हल्ला करून रक्तबंबाळ करत जखमी केले होते.