शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

विनाहेल्मेट पेट्रोल दिल्यास आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा!

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 31, 2022 15:42 IST

नाशिक पोलीस आयुक्तांचा इशारा; पेट्रोल पंप चालकांकडून संताप व्यक्त

नाशिक : गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर शहर पोलीस आयुक्तालयाकडून शहरात हेल्मेटसक्तीची मोहीम अत्यंत कठोर पद्धतीने राबविली जाणार असून विनाहेल्मेट दुचाकी चालकांना पेट्रोल दिल्यास पेट्रोल पंपचालक - मालकांवर थेट आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल करण्यात येईल, असा इशारा पोलीस आयुक्त दीपक पाण्डेय यांनी दिला आहे.

पोलीस आयुक्तांच्या या इशाऱ्यावर पेट्रोल पंपचालकांनी संताप व्यक्त केला आहे. हेल्मेट सक्तीच्या निर्णयाची अंमलबजावणी करण्याची जबाबदारी पेट्रोल पंपचालकांची आहे का, असा सवाल त्यांनी केला आहे. दुचाकी चालकासह त्याच्यासोबत असलेल्या सहप्रवाशालाही हेल्मेटचा वापर बंधनकारक राहणार आहे, अन्यथा दंडात्मक कारवाईला सामोरे जावे लागेल, असेही पाण्डेय यांनी सांगितले.  

नाशिकमध्ये मागील वर्षीपासून ‘नो हेल्मेट नो पेट्रोल’, नो हेल्मेट, नो को-ऑपरेशन, हेल्मेट नाही, समुपदेशनाला हजेरी बंधनकारक या पद्धतीने पोलीस आयुक्तालयाने हेल्मेटची सवय आणि शिस्त लावण्याचा प्रयत्न केला आहे. त्यानंतर विनाहेल्मेट दुचाकी चालविणाऱ्यांना समुपदेशनानंतर परीक्षाही घेतली जाऊ लागली आणि ई - चलनाच्या माध्यमातून दंडात्मक कारवाई सुरू करण्यात आली.  १ डिसेंबर २०२१ पर्यंत २,८७९ दुचाकी चालक व सहप्रवाशांचे समुपदेशन करण्यात आल्याचा दावा पोलिसांनी केला. जानेवारीपासून परीक्षेसोबत दंडात्मक कारवाई प्रभावीपणे राबविण्यात आली होती. यानंतर मागील महिन्यापासून या मोहिमेत काहीशी शिथिलता आली. परीक्षा व समुपदेशन थांबवून केवळ दंड वसुलीवर पोलिसांनी लक्ष केंद्रित केले. गुढीपाडव्यापासून पुन्हा हेल्मेट सक्तीची मोहीम अधिक कठोर व प्रभावीपणे राबविण्याचा निर्णय पाण्डेय यांनी घेतला आहे.

पंप धोकादायक ठरविणार विना हेल्मेट कोणी दुचाकी घेऊन पेट्रोल भरण्यास आल्यास त्याला आयुक्तालयाच्या हद्दीतील पेट्रोल पंप चालक - मालकांनी पेट्रोलचा पुरवठा करु नये, असे पोलीस आयुक्त दीपक पाण्डेय यांनी म्हटले आहे. गुन्हे दाखल झाल्यावरही पंपावरील चित्र बदलले नाही, तर मालकाला ‘तुमचा पेट्रोल पंप धोकादायक आहे, असे का ठरवू नये’ अशी कारणे दाखवा नोटीस बजावण्यात येणार असल्याचेही पाण्डेय म्हणाले.

टॅग्स :Petrolपेट्रोलNashikनाशिक