गृहकर्जाची परतफेड न केल्याने गुन्हा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 14, 2021 01:38 IST2021-04-13T23:00:39+5:302021-04-14T01:38:35+5:30
नाशिक : गृहकर्ज घेत कर्जाची परतफेड न करता बँकेची फसवणूक केल्याप्रकरणी सरकारवाडा पोलीस ठाण्यात संशयित विनोद प्रल्हाद पाटील (रा. काठेगल्ली) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल आहे.

गृहकर्जाची परतफेड न केल्याने गुन्हा
नाशिक : गृहकर्ज घेत कर्जाची परतफेड न करता बँकेची फसवणूक केल्याप्रकरणी सरकारवाडा पोलीस ठाण्यात संशयित विनोद प्रल्हाद पाटील (रा. काठेगल्ली) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल आहे.
देवीदास विश्वनाथ पालवे (३७, नाशिकरोड) यांच्या फिर्यादीनुसार संशयित पाटील यांनी २९-०९-२०१७ ते १२ एप्रिल २०२१ दरम्यान गंडा घातला. विनोद यांनी श्रद्धा लॅन्ड डेव्हलपर्स यांच्याकडील फ्लॅट खरेदी करण्याच्या बहाण्याने एमजी रोड येथील विजया बँकमधून (आताची बँक ऑफ बडोदा) ३७ लाख रुपयांचे गृहकर्ज घेतले.
कर्जाची रक्कम बांधकाम व्यावसायिक सुरेश पाटील यांची फर्म श्रद्धा डेव्हलपर्स या नावाच्या बँक खात्यात वर्ग केली. कर्ज घेतल्यानंतर पाटील यांनी कर्जाचे हप्ते भरले नाही. त्यामुळे बँकेची व्याजासह ४३ लाख ९८ हजार ६३० रुपयांची फसवणूक झाली. याप्रकरणी सरकारवाडा पोलीस तपास करीत आहेत.