चोराचा कारनामा! पेट्रोलची रिकामी बाटली घेऊन आला अन् नवीकोरी दुचाकी घेऊन पळाला

By ऑनलाइन लोकमत | Published: April 3, 2022 01:02 PM2022-04-03T13:02:20+5:302022-04-03T13:05:34+5:30

सिन्नर - पेट्रोल आणण्यासाठी शेजारच्या दुकानदाराने तुमची दुचाकी मागितली आहे, असे म्हणत चावी घेऊन दुचाकी लांबविल्याची घटना सिन्नर शहरात घडली. ...

Crime News In Nashik, a thief stole a new two-wheeler | चोराचा कारनामा! पेट्रोलची रिकामी बाटली घेऊन आला अन् नवीकोरी दुचाकी घेऊन पळाला

चोराचा कारनामा! पेट्रोलची रिकामी बाटली घेऊन आला अन् नवीकोरी दुचाकी घेऊन पळाला

Next

सिन्नर - पेट्रोल आणण्यासाठी शेजारच्या दुकानदाराने तुमची दुचाकी मागितली आहे, असे म्हणत चावी घेऊन दुचाकी लांबविल्याची घटना सिन्नर शहरात घडली. पेट्रोल आणण्यासाठी रिकामी बाटली सोबत घेऊन आलेल्या या भामट्याने दुचाकी मालकाच्या ताब्यातूनच चावी घेऊन त्याच्या डोळ्यासमोर दुचाकी घेऊन फरार करण्यासाठी वापरलेल्या या चोरीच्या फंड्याची चर्चा आहे.

त्याचे झाले असे.. सिन्नरच्या सरस्वती पुलावर चिकन दुकानात गर्दी असल्याने बिल्कीस वसीम सैय्यद (३६) या गर्दीत होत्या. सकाळी पावणेदहा वाजेच्या सुमारास एक युवक त्यांच्या दुकानावर आला. शेजारच्या कजरी मिठास वाल्याने पेट्रोल आणण्यासाठी तुमची मोटारसायकल मागितली आहे, असे सांगत तो त्यांच्याकडे त्यांच्या एक्टिव्हा स्कूटर (एमएच १५ एचव्ही १५५७)ची चावी मागू लागला. बिल्कीस सैय्यद यांनी त्या भामट्याला चावी देण्यास नकार दिल्यानंतर तो माघारी परतला. थोड्याच वेळात तो फोनवर बोलत आला. भाभी चावी देत नसल्याचे तो फोनवर बोलत होता. कजरीवाला भैय्या बोलत असल्याचे सांगून त्याने पुन्हा चावी मागितली. त्यामुळे बिल्कीस सैय्यद यांना शेजारचा दुकानदार फोनवर बोलत असावा, असा समज झाला.

दुकानावर गर्दी असल्याने त्यांनी दुचाकीची चावी त्याच्या हातात दिली. त्यानंतर या भामट्याने सैय्यद यांची दुचाकी घेऊन पोबारा केला. एक तासानंतर दुकानावरील गर्दी कमी झाल्यानंतर बिल्कीस यांना अजून पेट्रोल घेऊन तो व्यक्ती का आला नाही, असा संशय आल्याने त्यांनी कजरी मिठासच्या दुकानावर जाऊन मोटारसायकल अजून परत का आली नाही, असे विचारले. त्यावेळी कजरी मिठासच्या दुकानमालकाने आपण कोणालाच गाडी नेण्यासाठी सांगितले नसल्याचे म्हटले. त्यावेळी आपली फसवणूक झाल्याचे सैय्यद यांच्या लक्षात आले. त्यांनी याबाबत सिन्नर पोलीस ठाण्यात अज्ञात भामट्याच्या विरोधात सिन्नर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. अज्ञात चोरट्याने सुमारे ५० हजार रुपये किमतीची दुचाकी चोरून नेल्याचा गुन्हा सिन्नर पोलिसांनी दाखल केला आहे. पोलीस निरीक्षक संतोष मुटकुळे यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार राहुल निरगुडे अधिक तपास करीत आहेत.

 

Web Title: Crime News In Nashik, a thief stole a new two-wheeler

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.