खळबळजनक! आधी पत्नीने केली आत्महत्या, पाठोपाठ पतीची विहिरीत उडी
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 18, 2022 16:40 IST2022-04-18T16:36:59+5:302022-04-18T16:40:42+5:30
चांदवड : तालुक्यातील खेलदरी येथील पत्नीने विषारी औषध सेवन केल्याने तिचा मृत्यू झाला. त्यापाठोपाठ पतीनेही विहिरीत उडी मारल्याने आत्महत्या ...

खळबळजनक! आधी पत्नीने केली आत्महत्या, पाठोपाठ पतीची विहिरीत उडी
चांदवड : तालुक्यातील खेलदरी येथील पत्नीने विषारी औषध सेवन केल्याने तिचा मृत्यू झाला. त्यापाठोपाठ पतीनेही विहिरीत उडी मारल्याने आत्महत्या केल्याने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. वडनेरभैरव पोलीस स्टेशनला पती- पत्नी आत्महत्येप्रकरणी अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
खेलदरी येथील रेखा किरण दौंड (३०) या महिलेने शनिवारी (दि.१६) सायंकाळी साडेसहा वाजेच्या सुमारास राहत्या घरी काहीतरी विषारी औषध सेवन केल्याने तिचा भाया बाळासाहेब दौंड यांनी औषधोपचारासाठी उपजिल्हा रुग्णालय चांदवड येथे दाखल केले. मात्र, तेथील डॉक्टरांनी तपासून तिला मयत घोषित केल्याची खबर मुजफ्फर रहेमान पटेल यांनी वडनेरभैरव पोलीस स्टेशनला दिली. ही घटना घडत नाही तोच मयत रेखा दौंड हिचे पती किरण चिंधू दौंड (३५), रा. खेलदरी याने रविवारी (दि.१७) पहाटे साडेसहा वाजेच्या सुमारास शेतातील विहिरीत पाण्यात उडी मारून आपली जीवनयात्रा संपवली. याची खबर पुरीचे पोलीस पाटील चिंधू भावराव आव्हाड यांनी वडनेरभैरव पोलीस स्टेशनला दिली. याबाबत दोघांच्या मृत्यूबाबत वडनेरभैरव पोलीस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून, सहायक पोलीस निरीक्षक शेख यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस नाईक विजय घुमरे हे तपास करीत आहेत. दोघांनी आत्महत्या का केली, याचा तपास पोलीस करीत आहेत.