शहरं
Join us  
Trending Stories
1
सरन्यायाधीश बी.आर. गवई यांच्यावर वकिलाने वस्तू फेकली, सर्वोच्च न्यायालयात सुनावणीवेळी गोंधळ
2
'उपमुख्यमंत्र्यांनी तुमच्याकडून मदत घेण्याचे सांगितले' अकोल्याच्या माजी आमदारांना बदमाशांकडून फसवण्याचा प्रयत्न
3
IND vs PAK: पाकिस्तानचं 'संडे' रूटीन- भारताविरूद्ध खेळा, हरा आणि घरी जा! सलग ४ रविवार पराभव
4
अपघात प्रकरणात गौतमी पाटीलला 'क्लीन चीट', पोलिसांनी सांगितले, 'गुन्हा दाखल होऊ शकत नाही'
5
गिफ्ट मिळालेली 'HAVAL H9' कार अभिषेक शर्मा भारतात चालवू शकणार नाही; कारण ऐकून व्हाल हैराण
6
शिंदेसेना-भाजपा नेत्यांमध्ये कुरघोडी सुरूच; स्थानिक निवडणुकांपूर्वीच महायुतीत उडू लागले खटके
7
शाहरुख खानच्या मागे उभी असलेली ज्युनिअर आर्टिस्ट, आज आहे प्रसिद्ध अभिनेत्याची बायको
8
हृदयद्रावक! छोट्या भावाच्या मृत्यूचा धक्का, दादाला आला हार्ट अटॅक; प्रेग्नंट वहिनी कोसळली अन्...
9
Video: डोकं फोडलं, रक्तबंबाळ केलं..; भाजपच्या आमदार-खासदारवर जमावाचा जीवघेणा हल्ला
10
वकिलाने वस्तू भिरकावल्यावर सरन्यायाधीश भूषण गवई यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “तुम्ही...”
11
NPS आता म्युच्युअल फंडासारखं काम करणार! पैसे काढण्याचे नियम बदलले; १००% इक्विटीचा पर्याय
12
बिहारमध्ये कितपत खरे ठरले होते ओपिनियन पोल? आताच्या सर्व्हेत कुणाचं सरकार? 'इंटरेस्टिंग' आहेत आकडे!
13
'तू इथेच थांब, मी आलेच...'; सख्ख्या भावाच्या हातावर तुरी देऊन बहिणीच्याच नवऱ्यासोबत पळून गेली तरुणी!
14
“‘आय लव्ह मोहम्मद’ यात काही वाईट-चुकीचे नाही”; धीरेंद्र शास्त्रींना नेमके म्हणायचे तरी काय?
15
'सैयारा' फेम अहान पांडेच्या आगामी सिनेमाची चर्चा, 'ही' मराठी अभिनेत्री मुख्य भूमिकेत दिसणार?
16
सोनम वांगचुकच्या अटकेबाबत सर्वोच्च न्यायालयाने केंद्राला नोटीस बजावली; पत्नी गीतांजली यांनी केल्या दोन मागण्या
17
आता परतीचे दोर नाही, युतीची चर्चा फार पुढे गेलीय; मनसेसोबतच्या युतीवर संजय राऊत असं का म्हणाले?
18
Manas Polymers Listing: १५३ रुपयांवर लिस्ट झाला हा स्वस्त IPO; पहिल्याच दिवशी गुंतवणूकदारांना ९०%चा फायदा, झाले मालामाल
19
राम मंदिरावर लक्ष्मी प्रसन्न! १५३ कोटी दान, १७३ कोटी बँक व्याज; कमाई आकडे पाहून व्हाल अवाक्
20
३ महिने भरपूर पैसा, ४ राशींचे आयुष्यच बदलेल; कल्पनेपलीकडे यश-लाभ, बाबा वेंगांचे मोठे भाकित!

नाशिक शहरासह जिल्ह्यातील तरुणाई सैराट!

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 4, 2018 12:58 IST

अडीच वर्षातील आकडेवारी: शहरातून १४२१, तर जिल्ह्यातून १५५६ स्त्रिया-तरुणी बेपत्ता; मार्गदर्शनाची आवश्यकता

-विजय मोरे 

नाशिकवाढते शहरीकरण, एकत्रित कुटुंबपद्धतीचा -हास, चित्रपट, मोबाइलवरील विविध सोशल साइटचे वाढते प्रस्थ यामुळे शहरासह ग्रामीण भागातील तरुणाई सैराट झाली आहे़ १ जून २०१६ ते ५ जून २०१८ या ३० महिन्यांच्या कालावधीत नाशिक शहरातून एक हजार ४२१ स्त्रिया / तरुणी, तर नाशिक ग्रामीणमधून एक हजार ५५६ स्त्रिया / तरुणींनी घरातून पलायन केल्याची माहिती पोलिसांनी सामाजिक कार्यकर्ते तथा आरटीआय कार्यकर्ते महेंद्र मिसर यांना दिली आहे़ यामध्ये प्रेम प्रकरण,लग्नाचे आमिष दाखवून पळवून नेण्याचे प्रमाण अधिक असल्याचे समोर आले आहे़ विशेष म्हणजे बदनामीच्या भीतिपोटी काही पालक तक्रार देत नसल्याची शक्यता अधिक आहे.

नाशिक शहर व जिल्ह्यात विविध कारणांनी घरातून पलायन करणाऱ्या १८ ते २५ या वयोगटातील तरुण / तरुणींची संख्या सर्वाधिक आहे़ तर, त्या खालोखाल विवाहित स्त्री-पुरुषांचा समावेश आहे. मोबाइल हा प्रत्येकाच्याच जीवनाचा अविभाज्य भाग झाला. यामध्ये तरुणाई सर्वाधिक वेळ सोशल नेटवर्किंग साइटवर खर्च करतात़ या सोशल मीडियातील ओळखीतून प्रेम प्रकरण सुरू होते आणि घर सोडून जाण्याचे वा मुलासोबत पळून जाण्याचे प्रकार सुरू होतात़ विशेष म्हणजे पळून गेलेल्या तरुणी काही दिवसांतच परतल्यानंतर त्यांच्या पुनर्वसनाचा मोठा प्रश्न निर्माण होतो़पौगंडावस्थेतील शारीरिक आकर्षण, प्रेमाच्या जाळ्यात ओढून विवाहाचे आमिष दाखवून मुलींची वा महिलांची फसवणूक केल्याच्या अनेक घटनाही घडल्या आहेत़ कुटुंबांचा विरोध डावलून पळून जाण्याचे प्रकार वाढल्याचे आकडेवारीतून समोर आले आहे.

'शहरातून बेपत्ता झालेल्यांची आकडेवारी वर्ष हरविलेले, पळविलेले पुरुष / तरुण हरविलेले, पळविलेले महिला / तरुणीपुरुष मिळाले अल्प मुले मिळाले महिला मिळाले अल्प मुली मिळाले २०१६     २०९  --   ५९ --  --  ३४४ --  ७५ २०१७    ६४५ ५४९ ४७ ४१ ७३० ६५२ २६३ १५४ २०१८ २८४ २१० २८ २४ ३४७ २८६ ८४ ६४ एकूण ११३८ ७५९ ७५ ६५ १४२१ ९३८ ३२२ २१८जिल्ह्यातून बेपत्ता झालेल्यांची आकडेवारी वर्षे तरुण / पुरुष स्त्री/तरुणीं अल्पवयीन मुले अल्पवयीन मुली मुली १८ वर्ष बलात्कार / विनयभंग / हुंडाबळी २०१६   २०९ ३४४ ५९ ७५ --  ३३६२०१७   ८६  ७९१  २९ ५० ८० ११९ २०१८   --   ४२१ --  --  ५४ --एकूण -- १५५६ -- -- १३४ --

संघर्ष नको, संवाद हवानाशिक, औरंगाबाद, नागपूर, पुणे, अहमदनगर, जळगाव या जिल्ह्यांमध्ये तसेच मुंबई महानगरातील विविध महाविद्यालयांत महिला सुरक्षा, अत्याचार, प्रेम, प्रेमातून होणारी फसवणूक, साइबर गुन्हे, कुटुंब व्यवस्था या विषयांवर समाजसेवी, शासकीय अधिकारी, डॉक्टर, वकील यांना निमंत्रित करून मार्गदर्शन केले जात असल्याची मोहीम सुरू केली आहे. - महेंद्र मिसर, सामाजिक तथा आरटीआय कार्यकर्ते, मनमाड

आॅपरेशन मुस्कानहरवलेली मुले शोधण्यासाठी पोलीस यंत्रणेमार्फत आॅपरेशन मुस्कान राबविण्यात येते़ बालकांच्या शोधासाठी जुलै २०१५ ते जुलै २०१७ या कालावधीत चार ‘आॅपेरशन मुस्कान' राबविण्यात आले होते. त्यामध्ये हरवलेल्या एकूण बालकांपैकी एक हजार ६१३, तर २०१७ मध्ये ६४५ बालकांचा शोध पोलिसांनी लावला आहे.

 

टॅग्स :Crimeगुन्हाNashikनाशिक