गावठी कट्ट्यासह गुन्हेगारास अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 18, 2019 00:10 IST2019-07-18T00:09:13+5:302019-07-18T00:10:04+5:30

गावठी कट्टा विक्रीसाठी शहरात आलेल्या नाशिकरोड भागातील एका मारहाणीच्या गुन्ह्यात फरार असलेल्या संशयित गुन्हेगारास भद्रकाली पोलिसांनी ३० हजारांच्या गावठी पिस्तूल व जिवंत काडतुसांसह अटक केली आहे.

 Crime Branch arrested | गावठी कट्ट्यासह गुन्हेगारास अटक

गावठी कट्ट्यासह गुन्हेगारास अटक

नाशिक : गावठी कट्टा विक्रीसाठी शहरात आलेल्या नाशिकरोड भागातील एका मारहाणीच्या गुन्ह्यात फरार असलेल्या संशयित गुन्हेगारास भद्रकाली पोलिसांनी ३० हजारांच्या गावठी पिस्तूल व जिवंत काडतुसांसह अटक केली आहे.
एक इसम बेकायदेशीरपणे गावठी कट्टा विक्रीसाठी काठेगल्ली भागातील तपोवन रस्त्यावरील चौफुलीवर येणार असल्याची गुप्त माहिती भद्रकाली पोलीस ठाण्याच्या गुन्हे शोध पथकाला मिळाली. त्यानुसार पोलीस उपायुक्त उपआयुक्त लक्ष्मीकांत पाटील, वरिष्ठ पोलीस निरीक्षक मंगलसिंग सूर्यवंशी यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक विशाल मुळे, कय्यूम सय्यद, कुणाल राउत, वसीम शेख, सुरेश खालकर, इरफान शेख, गणेश निंबाळकर यांच्या पथकाने तपोवनरोडवरील ‘त्या’ चौफुलीच्या परिसरात सापळा रचला. सायंकाळी सव्वासहा वाजेच्या सुमारास संशयित गुन्हेगार अक्षय गणेश नाईकवाडे (वय २३, रा. सामनगावरोड) हा एका रिक्षामधून उतरताच पथकाने त्याच्यावर झडप घालून ताब्यात घेतले. सय्यद यांनी त्यास ओळखून नाशिकरोडच्या एका मारहाणीच्या गुन्ह्यात तो फरार होता, अशी माहिती मुळे यांना तत्काळ दिली. गावठी पिस्तुलासह, काडतूस जप्त करण्यात आले आहे. याप्रकरणी अक्षयविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Web Title:  Crime Branch arrested