तरुणीचा विनयभंग करणाऱ्या दोघांविरोधात गुन्हा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 20, 2018 00:13 IST2018-09-20T00:13:05+5:302018-09-20T00:13:30+5:30
सातपूर ते त्र्यंबकेश्वर खासगी वाहनाने प्रवास करणाऱ्या तरुणीचा दोघा संशयितांनी विनयभंग केल्याची घटना घडली आहे.

तरुणीचा विनयभंग करणाऱ्या दोघांविरोधात गुन्हा
नाशिक : सातपूर ते त्र्यंबकेश्वर खासगी वाहनाने प्रवास करणाऱ्या तरुणीचा दोघा संशयितांनी विनयभंग केल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी त्र्यंबकेश्वर तालुक्यातील खरवळ येथील मांजरमाळचे तुकाराम किसन देशमुख व गजीनाथ हिरामण देशमुख या दोघा संशयितांविरोधात सातपूर पोलीस ठाण्यात विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार पीडित तरुणी ७ सप्टेंबर रोजी सायंकाळी सहा वाजेच्या सुमारास सातपूरच्या श्रीराम चौकातून त्र्यंबकेश्वरला जाण्यासाठी खासगी प्रवासी वाहनात बसली. वाहनात ती बसलेली असताना संशयित तुकाराम देशमुख याने प्रवासात तिचा विनयभंग केला. यानंतर पीडितेने झालेला प्रकार घरी सांगितला. त्यामुळे तिचा भाऊ तुकाराम देशमुख याला विचारणा करण्यास गेला. त्यावेळी त्याने व त्याचा साथीदार गजीनाथ देशमुख यांनी तिच्या भावाला मारहाण करून शिवीगाळ केली. दरम्यान, सातपूर पोलिसांनी या दोघांही संशयितांना अटक केली आहे़