शासकीय कामात अडथळा आणणाऱ्या दोघांवर गुन्हा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 4, 2019 00:33 IST2019-05-04T00:30:51+5:302019-05-04T00:33:46+5:30
सहदेवनगर भागात रात्रीच्या वेळी अश्लील चाळे करणाऱ्यांवर निर्भया पथक कारवाई करीत असताना त्यांना काम करण्यास अडवून जोरजोरात आरडा ओरड करून तुम्ही कारवाई करून कामात अडथळा आणणाºयावर गंगापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

शासकीय कामात अडथळा आणणाऱ्या दोघांवर गुन्हा
गंगापूर : सहदेवनगर भागात रात्रीच्या वेळी अश्लील चाळे करणाऱ्यांवर निर्भया पथक कारवाई करीत असताना त्यांना काम करण्यास अडवून जोरजोरात आरडा ओरड करून तुम्ही कारवाई करून कामात अडथळा आणणाºयावर गंगापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
निर्भया पथकाने बुधवारी रात्री १० वाजेच्या सुमारास गंगापूररोड परिसरात बेकायदेशीरपणे बसून अश्लील चाळे करणाºयांविरोधात कारवाई केली. यावेळी काही तरुण-तरुणींनी तुम्ही आम्हाला ओळखत नाही, तुम्हाला काय करायचे ते करा आम्हाला काही फरक पडणार नाही असे बोलून पथकाला कारवाई करण्यापासून रोखण्याचा प्रयत्न केला. तसेच संशयित आरोपी रोहित अभय उगावकर (२७), अमेय अनिल सोनवणे (२५) यांनी पोलीस कर्मचारी ढुमसे यांच्या शर्टची कॉलर पकडून जोरात धक्का देऊन खाली पाडून सरकारी कामात अडथळा निर्माण केला. त्यामुळे पोलिसांनी दोघाही आरोपींना अटक करून गुन्हा दाखल केला. त्यांना कोर्टासमोर उभे केले असता त्यांना न्यायालयीन कोठडी देण्यात आली. याबाबत महिला पोलीस कर्मचारी अनिता निंबा पाटील यांनी गंगापूर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून, पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक पवार करीत आहेत. गेल्या काही दिवांसापासून गंगापूर परिसरात गुन्हेगारीत वाढ झाली आहे.