देवेंद्र फडणवीसांच्या 'त्या' व्हिडिओप्रकरणी 5 जणांवर गुन्हा दाखल

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 2, 2021 01:53 IST2021-05-02T01:53:05+5:302021-05-02T01:53:32+5:30

देवेंद्र फडणवीस यांनी महापालिकेच्या नवीन बिटको रुग्णालयाला भेट देऊन, तेथील वैद्यकीय सुविधांचा आढावा घेत, महापालिकेला काही त्रुटी दूर करण्याच्या सूचना केल्या

Crime against those who defamed Devendra Fadnavis | देवेंद्र फडणवीसांच्या 'त्या' व्हिडिओप्रकरणी 5 जणांवर गुन्हा दाखल

देवेंद्र फडणवीसांच्या 'त्या' व्हिडिओप्रकरणी 5 जणांवर गुन्हा दाखल

ठळक मुद्देदेवेंद्र फडणवीस यांनी महापालिकेच्या नवीन बिटको रुग्णालयाला भेट देऊन, तेथील वैद्यकीय सुविधांचा आढावा घेत, महापालिकेला काही त्रुटी दूर करण्याच्या सूचना केल्या.

नाशिक : नाशिक शहरातील कोरोना स्थितीचा आढावा घेण्यासाठी आलेले विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांचा बिटको रुग्णालयात व्हिडीओ काढून सोशल मीडियावर बदनामी केल्याप्रकरणी नाशिक पोलिसांनी पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

देवेंद्र फडणवीस यांनी महापालिकेच्या नवीन बिटको रुग्णालयाला भेट देऊन, तेथील वैद्यकीय सुविधांचा आढावा घेत, महापालिकेला काही त्रुटी दूर करण्याच्या सूचना केल्या. इतकेच नव्हे, तर नाशिकसाठी दाेन खासगी कंपन्यांचे गॅस टँकर मिळविण्यासाठी खासगी उद्योगांशी चर्चा करून, टँकरही उपलब्ध करून देण्याची व्यवस्था केली. मात्र, बिटको रूग्णालयात ते पाहणी करत असताना, काहींनी त्यांचा व्हिडीओ काढून सोशल मीडियावर शिवराळ टिप्पणीसह तो व्हायरल केला. त्यामुळे भाजपचे ब्लॉक अध्यक्ष हेमंत गायकवाड यांनी पोलिसांत तक्रार केली आहे.

Web Title: Crime against those who defamed Devendra Fadnavis