स्कार्पिओ पळविणाऱ्या चौघांविरोधात गुन्हा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 14, 2019 16:04 IST2019-01-14T16:03:43+5:302019-01-14T16:04:04+5:30
वणी : जिंदाल पॉलीफील्मच्या चालकाला चाकुचा धाक दाखवुन चार अज्ञात संशयितांनी ४ लाख ५७ हजार ५०० रूपयांचा ऐवज लुटुन नेल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आह.

स्कार्पिओ पळविणाऱ्या चौघांविरोधात गुन्हा
वणी : जिंदाल पॉलीफील्मच्या चालकाला चाकुचा धाक दाखवुन चार अज्ञात संशयितांनी ४ लाख ५७ हजार ५०० रूपयांचा ऐवज लुटुन नेल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आह. राजेंन्द्र लक्ष्मण खताळे (४५) राहणार ओंडाली वैतरणा तालुका ईगतपुरी हे जिंदाल पॉलीफिल्म लिमीटेड या कंपनीत चालक आहेत. एमएच १५ इएक्स ८०६३ ही सफेद रंगाची स्कार्पिओ ते चालवित असताना चार इसम बसले. राजेंन्द्र खताळे यांच्या पोटाचे खाली चाकु लावुन जखमी करत त्यांच्याकडून भ्रमणध्वनी व स्कार्पिओ कारची चोरी केल्याची फिर्याद खताळ यांनी दिली. दरम्यान नाशिक ते गोंदे फाटा ता ईगतपुरी व पांडाणे शिवार तालुका दिंडोरी असे गुन्ह्याचे ठिकाण नमुद करण्यात आले आहे. वणी पोलिसांनी या गुन्ह्याचा तपास सुरु केला आहे.