आत्महत्येप्रकरणात पतीसह पाच जणांवर गुन्हा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 29, 2020 00:10 IST2020-06-29T00:10:03+5:302020-06-29T00:10:59+5:30

पाटीलनगर येथे राहणाऱ्या एका विवाहितेने आत्महत्या केल्याप्रकरणी पतीसह पाच जणांवर आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा अंबड पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आला आहे.

Crime against five persons including husband in suicide case | आत्महत्येप्रकरणात पतीसह पाच जणांवर गुन्हा

आत्महत्येप्रकरणात पतीसह पाच जणांवर गुन्हा

ठळक मुद्देमानसिक छळ : घातपाताचा संशय

सिडको : परिसरातील पाटीलनगर येथे राहणाऱ्या एका विवाहितेने आत्महत्या केल्याप्रकरणी पतीसह पाच जणांवर आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा अंबड पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आला आहे.
वर्षा सचिन अहिरे (२४, रा. पाटीलनगर, सिडको) या विवाहित महिलेने गुरुवारी (दि.२५) राहत्या घरी किचनमध्ये पंख्याला दोरीच्या साह्याने गळफास घेऊन आत्महत्या केली होती. या महिलेला त्रिमूर्ती चौकातील एका खासगी रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी तिला मृत घोषित करत जिल्हा रुग्णालयात हलविण्यात आले होते. यावेळी तिच्याजवळ चिठ्ठी सापडल्याने तिच्या माहेरच्या नातेवाइकांनी गोंधळ घातला होता. तसेच मिळालेल्या चिठ्ठीच्या आधारे मयत महिलेचा भाऊ कमलेश जाधव याने अंबड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली होती. त्यांनी दिलेल्या फिर्यादीत वर्षाच्या सासरच्या लोकांनी वर्णभेद करतांनाच तुला स्वयंपाक बनविता येत नाही अशा विविध कारणांनी मानसिक छळ केला जात असल्याचा आरोप करण्यात आला असून, घर बांधण्यासाठी माहेरहून पैशांची मागणी केली जात होती. या सर्व प्रकारामुळे वर्षा हिने आत्महत्या केल्याचेही तक्रारीत नमूद केले आहे. त्यांच्या फिर्यादीवरून अंबड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास अंबड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक कुमार चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.

Web Title: Crime against five persons including husband in suicide case