राहूल गांधींच्या समर्थनार्थ आंदोलन करणाऱ्या काँग्रेस पदाधिकाऱ्यांवर गुन्हा
By नामदेव भोर | Updated: March 24, 2023 16:39 IST2023-03-24T16:37:48+5:302023-03-24T16:39:27+5:30
पोलिस आयुक्तांच्या मनाई आदेशाचे उल्लंघन केल्या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

राहूल गांधींच्या समर्थनार्थ आंदोलन करणाऱ्या काँग्रेस पदाधिकाऱ्यांवर गुन्हा
नाशिक : सुरत न्यायालयाने शिक्षा सुनविल्याच्या पार्श्वभूमीवर राहुल गांधी यांच्या समर्थनास नाशिक शहर काँग्रेस कमिटीतर्फे गुरुवारी निदर्शने करण्यात आली. या आंदोलनात सहभागी काँग्रेस पदाधिकारी सरकारवाडा पोलिस ठाण्यात पोलिस आयुक्तांच्या मनाई आदेशाचे उल्लंघन केल्या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसानी दिलेल्या माहितीनुसार, सेवादलाचे शहर अध्यक्ष वसंत ठाकूर, माजी नगरसेवक वत्सला खैरे, अल्पसंख्यानक शहर अध्यक्ष हनिफ बशीर, महिला शहर अध्यक्ष स्वाती जाधव, गौरख सोनार,अरुणा आहेर यांच्यासह अन्य चार ते पाच कार्यकर्ते व पदाधिकऱ्यावर सरकारवाडा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नाशिक शहर पोलिस आयुक्त अंकूश शिंदे यांनी शहरात मनाई आदेश लागू केलेले असताना काँग्रेस पदाधिकाऱ्यांनी एमजी रोड येथील काँग्रेसभवन परिसरात घोषणाबाजी करून निरदर्शने आंदोलन केले. त्यामुळे पोलिसांनी आंदोलनात सहभागी काँग्रेस पदाधिकारी आणि आंदोलकांवर गुन्हा दाखल केला आहे.