आत्महत्येस प्रवृत्त केल्या प्रकरणी प्रियकरावर गुन्हा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 26, 2018 00:55 IST2018-08-26T00:55:08+5:302018-08-26T00:55:32+5:30
विवाह ठरलेल्या प्रेयसीला विवाहास मज्जाव करून केवळ माझ्यासोबतच प्रेमसंबंध ठेव तसेच होणाऱ्या पतीला ठार मारण्याची धमकी प्रियकराने दिल्यानेच प्रेयसीने आत्महत्या केल्याचे पोलीस तपासात समोर आले आहे़

आत्महत्येस प्रवृत्त केल्या प्रकरणी प्रियकरावर गुन्हा
नाशिक : विवाह ठरलेल्या प्रेयसीला विवाहास मज्जाव करून केवळ माझ्यासोबतच प्रेमसंबंध ठेव तसेच होणाऱ्या पतीला ठार मारण्याची धमकी प्रियकराने दिल्यानेच प्रेयसीने आत्महत्या केल्याचे पोलीस तपासात समोर आले आहे़ या प्रकरणी भद्रकाली पोलिसांनी संशयित प्रियकर योगेश उदावंत (२७, रा. काझीची गढी, कुंभारवाडा, जुने नाशिक) यास अटक केली आहे़ पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार जाधव चाळीतील अपेक्षा सोनवणे या तरुणीने १९ आॅगस्ट रोजी राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली़ या प्रकरणी भद्रकाली पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली होती़; मात्र या आत्महत्येचा तपास करीत असलेल्या पोलिसांना अपेक्षा सोनवणे व संशयित योगेश उदावंत यांच्यात सुमारे दीड वर्षापासून प्रेमसंबंध होते़ गत काही दिवसांपूर्वी अपेक्षाचा विवाह ठरला होता व याची कुणकुण योगेशला लागली होती़ त्याने तिच्या घरी येऊन तू विवाह करू नको, माझ्यासोबत प्रेमसंबंध ठेव असे म्हणत अपेक्षाच्या घराच्या दरवाजाला लाथा मारून ‘तुझे लग्नच होऊ देणार नाही’अशी धमकी दिली. तसेच विवाह केल्यास भावी नवरा व भावास जिवंत सोडणार नाही या धमकीमुळे अपेक्षा मानसिक तणावाखाली होती़ संशयित योगेशच्या सततच्या जाचास कंटाळून बेडरूममधील फॅनला गळफास घेऊन आत्महत्या केली़ या प्रकरणी भद्रकाली पोलिसांनी संशयित योगेश उदावंत यास अटक केली आहे.