शंखनाद आंदोलनासाठी रामकुंड परिसरात जमलेल्या गर्दीमुळे पोलीस आयुक्तांच्या आदेशाचे, तसेच साथरोग कायद्याचे उल्लंघन केल्याप्रकरणी भाजप आमदार सीमा हिरे, आध्यात्मिक आघाडी प्रदेशाध्यक्ष तुषार भोसले यांच्यासह भाजपच्या २५ कार्यकर्त्यांवर पंचवटी पोलीस ठाण्यात आपत्ती व्यवस्थापन कायद्यान्वये गुन्हा दाखल केल्याची माहिती पोलिसांनी दिली.
याबाबत माहिती अशी की, राज्यातील मंदिरे कोरोना प्रादुर्भाव वाढू नये, यासाठी शासनाने गेल्या अनेक महिन्यांपासून बंद केली आहेत. मात्र, असे असतानाही भाजप पदाधिकाऱ्यांनी मंदिर सुरू करावी, यासाठी सोमवारी सकाळच्या सुमाराला रामकुंडावर आमदार सीमा हिरे आध्यात्मिक आघाडीचे तुषार भोसले, शहराध्यक्ष गिरीश पालवे, पुरोहित संघाचे सतीश शुक्ल, धनंजय पुजारी, उत्तम उगले, चंद्रशेखर पंचाक्षरी, महेश पंडित, रामसिंग बावरी, शेखर शुक्ल, विजय बनसोडे, नवनाथ ढगे, शिवम शिंपी आदींसह इतर कार्यकर्त्यांनी शंखनाद करून आंदोलन करत, नियमांचे उल्लंघन केले, म्हणून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.