कत्तलीसाठी जनावरे बाळगल्याप्रकरणी गुन्हा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 15, 2019 01:00 IST2019-03-15T00:59:33+5:302019-03-15T01:00:44+5:30
मालेगाव शहरातील महेशनगर भागात महिंद्रा पिकअपमध्ये कत्तलीसाठी जनावरे कोंबून त्यांची वाहतूक केल्याप्रकरणी अफजलखान सईदखान कुरैशी याच्याविरुद्ध शहर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला.

कत्तलीसाठी जनावरे बाळगल्याप्रकरणी गुन्हा
मालेगाव : शहरातील महेशनगर भागात महिंद्रा पिकअपमध्ये कत्तलीसाठी जनावरे कोंबून त्यांची वाहतूक केल्याप्रकरणी अफजलखान सईदखान कुरैशी रा. स. नं. १५, कमालपुरा याच्याविरुद्ध शहर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला. पोलीस कर्मचारी विशाल गोसावी यांनी फिर्याद दिली. सकाळी पावणेअकरा वाजेच्या सुमारास महिंद्रा पिकअपसह ४३ हजार ५०० रुपये किमतीची पाच जनावरे पोलिसांनी जप्त केली. अधिक तपास पोलीस नाईक निकम करीत आहेत.