नवीन कसारा घाटात दरड कोसळली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 7, 2019 17:08 IST2019-07-07T17:08:35+5:302019-07-07T17:08:41+5:30
लोकमत न्युज नेटवर्क इगतपुरी : रविवारी पहाटे दरम्यान नाशिकहुन मुंबईला जाणा्ऱ्या नवीन कसारा घाटात गेल्या आठवड्यापासुन सतंतधार पाऊस सुरु आहे. या सतंतधार पावसामुळे घाटातील ब्रेकफेल पाँइट जवळ दरड कोसळल्याने काही काळ मुंबईला जाणारी वाहतुक ठप्प झाली होती.

नवीन कसारा घाटात दरड कोसळली
लोकमत न्युज नेटवर्क इगतपुरी :
रविवारी पहाटे दरम्यान नाशिकहुन मुंबईला जाणा्ऱ्या नवीन कसारा घाटात गेल्या आठवड्यापासुन सतंतधार पाऊस सुरु आहे. या सतंतधार पावसामुळे घाटातील ब्रेकफेल पाँइट जवळ दरड कोसळल्याने काही काळ मुंबईला जाणारी वाहतुक ठप्प झाली होती.
आज रविवार असल्याने मुंबई महामार्गावर वाहतूक जास्त प्रमाणात आहे. पावसामुळे घाटात ठीक ठीकाणी ‘फॉल’ तयार झाले असुन प्रवासी कार चालक हे ‘फॉल’ पाहण्यासाठी व सेल्फी काढण्यासाठी येथे गर्दी करत असल्यानेही अपघाताचा धोका वाढला आहे. तसेच कालपासून पावसाने जोर धरला असून घाटमाथ्यावर मोठ्या प्रमाणात धुके आले आहे. यामुळे वाहनचालकांना कसारा घाटातून जाताना दिवसाढवळ्या गाडीच्या लाईट लावून प्रवास करावा लागत आहे.
फोटो - नवीन कसारा घाटात दरड बाजूला करत असताना पोलीस व कर्मचारी आदी दिसत आहे.(07इगतपुरी कसारा)