करंजाळीत वेडसर इसमाचा मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 13, 2020 23:45 IST2020-08-13T20:39:17+5:302020-08-13T23:45:54+5:30
पेठ : तालुक्यातील करंजाळी परिसरात बेवारस फिरणाऱ्या वेडसर इसमाचा रस्त्यावर मृत्यू झाल्याची घटना घडली.

करंजाळीत वेडसर इसमाचा मृत्यू
लोकमत न्यूज नेटवर्क
पेठ : तालुक्यातील करंजाळी परिसरात बेवारस फिरणाऱ्या वेडसर इसमाचा रस्त्यावर मृत्यू झाल्याची घटना घडली.
अनेक दिवसापासून करंजाळी भागात बेवारस फिरणारा एक २७ वर्षीय वेडसर युवक बाजार पटांगणातील एका इमारतीच्या ओट्यावर पडलेला नागरिकांना आढळून आला. पोलीस पाटील मनोहर गवळी यांनी याबाबत पेठ पोलीसात खबर दिली. पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन त्यास ग्रामीण रु ग्णालयात दाखल केले असता वैद्यकिय अधिकाऱ्यांनी मृत घोषित केले. रंगाने गोरा, सडपातळ शरीरयष्टी, डोक्याचे व दाढीचे केस वाढलेले, अंगात पांढरा शर्ट व निळी जिन्स घातली असून याबाबत ओळख पटल्यास पेठ पोलिसांशी संपर्क करण्याचे आवाहन केले आहे.