विषारी औषधाच्या सेवनाने गायीचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 25, 2018 23:51 IST2018-10-25T23:51:16+5:302018-10-25T23:51:41+5:30

सिन्नर : तालुक्यातील मºहळ बुद्रुक येथील पोलीसपाटील दीपक भाऊराव कुºहे यांच्या गायीचा विषारी औषध सेवनाने बुधवारी पहाटेच्या सुमारास मृत्यू झाला. गायीला विषारी औषध दिल्यानेच तिचा मृत्यू झाला असल्याचा आरोप कुºहे यांनी केला आहे.

Cows death by poisonous drug intake | विषारी औषधाच्या सेवनाने गायीचा मृत्यू

विषारी औषधाच्या सेवनाने गायीचा मृत्यू

ठळक मुद्दे चौकशी करून दोषींवर कारवाई करण्याची मागणी

सिन्नर : तालुक्यातील मºहळ बुद्रुक येथील पोलीसपाटील दीपक भाऊराव कुºहे यांच्या गायीचा विषारी औषध सेवनाने बुधवारी पहाटेच्या सुमारास मृत्यू झाला. गायीला विषारी औषध दिल्यानेच तिचा मृत्यू झाला असल्याचा आरोप कुºहे यांनी केला आहे.
दीपक कुºहे शेताकडे गेल्यावर त्यांना गाय मृतावस्थेत आढळून आली. गाय बांधलेल्या ठिकाणी विषारी औषधाचे अंश आढळून आल्याने गायीचा घातपाताने मृत्यू झाल्याची तक्रार कुºहे यांनी वावी पोलीस ठाण्यात दिली. सुमारे ८० हजार रुपयांची दुभती गाय दगावल्याने कुºहे कुटुंबावर आघात झाला असून, याप्रकरणी चौकशी करून दोषींवर कारवाई करण्याची मागणी केली आहे. दरम्यान, गायीचा मृत्यू झाल्याची माहिती देऊनही दोडी येथील पशुधन विकास अधिकारी पंचनामा करायला आले नाही.

Web Title: Cows death by poisonous drug intake

टॅग्स :cowगाय