नि-हाळे येथे बिबट्याच्या हल्ल्यात गाय ठार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 14, 2019 17:19 IST2019-11-14T17:18:46+5:302019-11-14T17:19:58+5:30
नि-हाळे : सिन्नर तालुक्यातील नि-हाळे येथे बिबट्याच्या हल्ल्यात गाय ठार झाल्याची घटना नुकतीच घडली. त्यामुळे पशुपालकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

नि-हाळे येथे बिबट्याच्या हल्ल्यात गाय ठार
बिबट्याचा बंदोबस्त करण्याची मागणी परिसरातून होत आहे. दोन बिबट्यांनी एकाच वेळी गायीवर हल्ला केल्याची परिसरात चर्चा आहे. येथील गणपत देवराम काकड या शेतकऱ्याची गाय शिवारात बांधलेली असताना मध्यरात्रीच्या सुमारास बिबट्याने गायीवर हल्ला चढविला. त्यात गाय ठार झाली. काकड यांना वनविभागाने भरपाई द्यावी अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.