उद्योजक व कामगार यांना मोठ्या प्रमाणात लसीकरण करणे अद्यापही बाकी आहे. प्रशासक मंडळाने सर्वात महत्त्वाच्या विषयावर काम करण्याचे ठरविले. आमदार माणिकराव कोकाटे व पंचायत समितीचे गटनेते विजय गडाख यांच्या माध्यमातून व प्रशासक सुधा माळोदे (गडाख) यांच्या प्रयत्नातून उद्योजक व कामगारांसाठी कोविड लसीकरण मोहिमेचा शुभारंभ करण्यात आला. प्रमुख पाहुणे म्हणून पंचायत समितीचे गटनेते विजय गडाख, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. मोहन बच्छाव, डॉ. सागर विधाते, सिन्नर उपजिल्हा रुग्णालयाच्या अधीक्षक डॉ. वर्षा लहाडे व वैद्यकीय अधिकारी डॉ. गरुड यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.
प्रशासक संजय शिंदे यांनी प्रास्ताविक केले. त्यानंतर खडे यांनी लसीकरणाचे महत्त्व समजावून सांगत संस्थेचे विशेष लसीकरण मोहीम आयोजित केल्याबद्दल कौतुक केले. विजय गडाख यांनी लसीकरणांचा पुरेसा साठा उपलब्ध करून देण्यासाठी पूर्ण सहकार्य करण्याचे आश्वासन देत लसीकरणाबरोबरच इतरही उद्योजकांच्या हिताचे निर्णय राबविण्यासाठी प्रशासक मंडळाने पुढाकार घ्यावा, असे आवाहन केले. अध्यक्ष सुधा माळोदे (गडाख) यांनीही मनोगत व्यक्त केले. संस्थेचे माजी चेअरमन अविनाश तांबे यांनी उद्योजकांमधून प्रशासक मंडळ नेमण्याचे फायदे आता हळूहळू दिसायला सुरुवात झाल्याचे सांगितले. उद्योजक रामदास दराडे यांना लस देऊन लसीकरणाची सुरुवात करण्यात आली. याप्रसंगी प्रशासक उपाध्यक्ष नारायण पाटील, संजय शिंदे, पंडितराव लोंढे, बाबासाहेब दळवी, शिवाजी आवारे, व्यवस्थापक कमलाकर पोटे यांच्यासह उद्योजक व कामगार उपस्थित होते.
फोटो - ०१ सिन्नर लसीकरण
सिन्नर तालुका सहकारी औद्योगिक वसाहतीत उद्योजक व कामगारांसाठी आयोजित करण्यात आलेल्या लसीकरण मोहिमेच्या शुभारंभप्रसंगी बोलताना पंचायत समितीचे गटनेते विजय गडाख. समवेत सुधा माळोदे (गडाख), डॉ. वर्षा लहाडे, नारायण पाटील, संजय शिंदे, पंडितराव लोंढे, अविनाश तांबे, बाबासाहेब दळवी, शिवाजी आवारे, व्यवस्थापक कमलाकर पोटे आदी.
010921\01nsk_46_01092021_13.jpg
फोटो - ०१ सिन्नर लसीकरण सिन्नर तालुका सहकारी औद्योगिक वसाहतीत उद्योजक व कामगारांसाठी आयोजित करण्यात आलेल्या लसीकरण मोहिमेच्या शुभारंभाप्रसंगी बोलतांना पंचायत समितीचे गटनेते विजय गडाख. समवेत सुधा माळोदे (गडाख), डॉ. वर्षा लहाडे, नारायण पाटील, संजय शिंदे, पंडितराव लोंढे, अविनाश तांबे, बाबासाहेब दळवी, शिवाजी आवारे, व्यवस्थापक कमलाकर पोटे आदि.