कोविड कक्ष बंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 26, 2021 04:11 IST2021-06-26T04:11:59+5:302021-06-26T04:11:59+5:30
दरवाढीमुळे सर्वसामान्यांत नाराजी नाशिक : भाजीपाल्याचे दर मोठ्या प्रमाणात वाढल्याने सर्वसामान्यांचे आर्थिक गणित कोलमडले आहे. दरवाढीमुळे घरातील सर्वांच्या आवडीची ...

कोविड कक्ष बंद
दरवाढीमुळे सर्वसामान्यांत नाराजी
नाशिक : भाजीपाल्याचे दर मोठ्या प्रमाणात वाढल्याने सर्वसामान्यांचे आर्थिक गणित कोलमडले आहे. दरवाढीमुळे घरातील सर्वांच्या आवडीची भाजी निवडताना गृहिणींना कसरत करावी लागते. एकापेक्षा अधिक भाज्या तयार करणेही टाळण्याकडे गृहिणींचा कल वाढला आहे. दरवाढीमुळे नाराजी व्यक्त केली जात आहे.
शेतकऱ्यांना पुन्हा वखरणीचा खर्च
नाशिक : हवामान विभागाचा पावसाचा अंदाज चुकल्याने शेतकऱ्यांमधून चिंता व्यक्त केली जात आहे. ज्यांनी पेरणीसाठी वावर तयार करून ठेवले होते तेथे आता मोठ्या प्रमाणात गवत उगवल्याने शेतकऱ्यांना पुन्हा वखरणी किंवा फणनी करावी लागत आहे. यामुळे खर्च वाढला आहे.
ढाप्यांमुळे वाहतुकीस अडथळा
नाशिक : शहरातील काही मार्गांवर भूमिगत गटारींच्या चेंबरवर लावलेले ढापे खोल गेले आहेत. यामुळे त्या ठिकाणी खड्डा तयार झाला असून, रात्रीच्या वेळी अनेक वाहनचालकांना त्याचा अंदाज येत नसल्याने वाहन खड्ड्यात आदळते. यामुळे वाहनांचे नुकसान होते. कधी कधी छोटा - मोठा अपघातही होतो. महापालिकेने ढाप्यांची दुरुस्ती करावी, अशी मागणी करण्यात येत आहे.
अवैध मद्यविक्रीकडे पोलिसांचे दुर्लक्ष
नाशिक : शहरातील काही भागात अवैध मद्य विक्री जोरात सुरू असून, याकडे पोलिसांचे दुर्लक्ष होत आहे. रात्रीच्या वेळी अशा ठिकाणांवर मोठ्या प्रमाणात गर्दी हात असते. यामुळे परिसरातील नागरिकांमध्ये नाराजी व्यक्त केली जात असून, पोलिसांनी अवैध मद्यविक्रीला आळा घालावा, अशी मागणी केली जात आहे.
रस्त्यावरील वाहनांमुळे अडथळा
नाशिक : सारडा सर्कल ते गडकरी चौक मार्गावर असलेल्या अनेक दुकानांसमोर मोठ्या प्रमाणात चारचाकी वाहने उभी राहात असल्याने या मार्गावर वाहतुकीस अडथळा निर्माण होतो. कधी कधी वाहतूक कोंडीचाही सामना करावा लागतो. याबाबत योग्य ती कार्यवाही करण्याची मागणी करण्यात येत आहे.
चूक दुरुस्तीसाठी शिबिरांचे आयोजन
नाशिक : हस्तलिखीत मूळ सातबारा आणि संगणकीकृत सातबारा यांमधील चुका दुरुस्तीसाठी जिल्ह्यातील विविध तहसील कार्यालयांमार्फत विशेष शिबिरांचे आयोजन करण्यात येत असून, या शिबिरांचा लाभ घेऊन संबंधितांनी आपल्या जमिनींच्या नोंदीबाबत असलेल्या चुकांची दुरुस्ती करून घ्यावी, असे आवाहन प्रशासनाच्यावतीने करण्यात आले आहे.
फलकांमुळे शहराचे विद्रुपीकरण
नाशिक : शहरातील विविध मार्गांवर राजकीय नेते, कार्यकर्त्यांकडून आणि दुकानदारांकडून अनधिकृतपणे फलकबाजी केली जात असून, यामुळे शहराच्या विद्रुपीकरणात भर पडत आहे. अनधिकृतपणे फलक उभारणाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी जागरूक नाशिककरांकडून केली जात आहे.