शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
3
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
4
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
5
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
6
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
7
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
8
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
9
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
10
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
11
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
12
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
13
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
14
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
15
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
16
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
17
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
18
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
19
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
20
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
Daily Top 2Weekly Top 5

चुलत भावानेच घेतला बहिणीचा बळी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 19, 2021 01:59 IST

पिंपळगाव बसवंत : महाविद्यालयीन तरुणी दिपिका अजय ताकाटे (वय १७) हिचा गळा घोटून खून करूनअहेरगाव पालखेड डाव्या कालव्यात मृतदेह फेकून दिल्याची धक्कादायक घटना समोर आली असून ४८ तासात पिंपळगाव पोलिसांनी तरुणीचा चुलत भाऊ संशयित विक्रम गोपीनाथ ताकाटे (रा.कारसुळ) व सहकारी मित्र सौरभ दत्तात्रय निफाडे (रा.खडकजांब) या दोघांच्या मुसक्या आवळत जेरबंद केले आहे.

ठळक मुद्देदोघे गजाआड : कारसूळच्या युवतीच्या खुनाचा उलगडा

पिंपळगाव बसवंत : महाविद्यालयीन तरुणी दिपिका अजय ताकाटे (वय १७) हिचा गळा घोटून खून करूनअहेरगाव पालखेड डाव्या कालव्यात मृतदेह फेकून दिल्याची धक्कादायक घटना समोर आली असून ४८ तासात पिंपळगाव पोलिसांनी तरुणीचा चुलत भाऊ संशयित विक्रम गोपीनाथ ताकाटे (रा.कारसुळ) व सहकारी मित्र सौरभ दत्तात्रय निफाडे (रा.खडकजांब) या दोघांच्या मुसक्या आवळत जेरबंद केले आहे.पिंपळगाव पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कारसुळ येथील विद्यार्थीनी कु. दिपिका अजय ताकाटे ही पिंपळगाव बसवंत येथील महाविद्यालयात १२वी वाणिज्य शाखेत शिकत होती. सकाळी ती नियमितपणे बसने पिंपळगाव बसवंत येथे प्रवास करत असे. सोमवारी (दि.१५) कॉलेज संपल्यावर ती घराकडे परतलीच नसल्याने घरच्यांनी शोधाशोध केली. पण ती सापडली नाही. मंगळवारी ( दि.१६) सकाळी दहा वाजेच्या सुमारास आहेरगाव येथील पालखेड डावा कालव्यात तिचा मृतदेह आढळून आल्याने खळबळ उडाली. पिंपळगाव बसवंत येथून ती आहेरगाव येथे गेलीच कशी, तसेच पालखेड डावा कालवा बंद केल्याने दि १५ रोजी या कालव्यात अवघे पाच फुटांपर्यंत पाणी असल्याने ती बुडेलच कशी अशा शंका व्यक्त करण्यात येऊन तिचा घातपात झाला असावा, या बाबतीत पोलीस तपास करत असताना पिंपळगाव पोलिसांनी सूत्रे फिरवीत मुलीचा चुलत भाऊ विक्रम गोपीनाथ ताकाटे रा.कारसुळ व सहकारी मित्र सौरभ दत्तात्रय निफाडे रा.खडकजांब या दोघांची चौकशी केली. त्यांना पोलीसी हिसका दाखवला असता त्यांनी खुनाची कबुली दिली. याबाबत पिंपळगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपासकामी नाशिक ग्रामीणचे उपअधीक्षक अर्जुन भोसले यांचेसह पिंपळगाव पोलीस ठाण्याचे निरीक्षक भाऊसाहेब पटारे, पप्पू देवरे, रवि बारहाते, मिथुन घोडके, दुर्गेश बैरागी, उषा वाघ आदिनी महत्त्वपूर्ण कामगिरी बजावली.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संशयित आरोपी चुलत भाऊ विक्रम ताकाटे याने बहिणीला पिकअप गाडीतून (क्रमांक एम एच ४१ जी २९४२) नेऊन सटाणा-ताहाराबाद रस्त्यावर मित्राच्या सहाय्याने सोग्रास शिवारात दोरीने गळा आवळून तिचा खून केला. त्यानंतर सदर संशयितांनी युवतीचा मृतदेह अहेरगाव येथील पालखेड डाव्या कालव्यात पूर्ण पाणी असल्याने फेकून देत पलायन केले व तिने आत्महत्या केल्याचे दर्शविले. मात्र पिंपळगाव पोलिसांनी अवघ्या ४८तासात खुनाचा उलगडा करत संशयितांच्या मुसक्या आवळल्या असुन त्यांच्यावर खुनाचा व खून करून पुरावा नष्ट केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, चुलत भावाने बहिणीचा बळी का घेतला याबाबत पोलीस चौकशी करत आहेत.

 

टॅग्स :MurderखूनPolice Stationपोलीस ठाणे