This country is a place of heroic soldiers ... | ये देश है वीर जवानों का...

ये देश है वीर जवानों का...

नाशिक : शहरातील विविध शाळांमध्ये कारगिल विजय दिनानिमित्त भारतीय शहीद जवानांना श्रद्धांजली अर्पण करून भारतीय सैन्याच्या शौर्याला सलाम करण्यात आला़ विविध सामाजिक संस्था, संघटनांच्या वतीने कारगिल विजय दिन साजरा करण्यात आला़
वडनेर गेट येथे साई अनिरुद्ध समर्थ संस्थेच्या वतीने कारगिल विजय दिनानिमित्त माजी लष्करी अधिकारी व सैनिकांचा सत्कार करून आरोग्य तपासणी करण्यात आली. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी नगरसेवक प्रभाकर पाळदे होते. कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून आयोजक डॉ. युवराज मुठाळ, डॉ. संजय गुप्ता, नगरसेवक केशव पोरजे, ज्येष्ठ शिवसैनिक उत्तम कोठुळे, विक्रम कोठुळे, संजय पोरजे, राष्टÑवादी कॉँग्रेसचे तालुका उपाध्यक्ष सुनील कोथमिरे, सुनील पोरजे, राजू पोरजे, संपत बुटे, अर्जुन पोरजे, हिरामण माळी, पांडुरंग पोरजे आदी मान्यवर उपस्थित होते.
प्रारंभी कारगिल युद्धात शहीद झालेल्या लष्करी अधिकारी व जवानांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. यावेळी प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते माजी कॅप्टन कमल सिंग, कॅप्टन ए.पी. राठोड, कॅप्टन रामदास शिरोडे, कॅप्टन यशवंत हुन्नरे, कॅप्टन सुकदेव गवळी, सुभेदार मेजर जेपीएन पाठक, सुभेदार राजेंद्र जाधव, सुभेदार राम यादव, सुभेदार भरत सिंग, सुभेदार जितेंद्र सिंग, विलास निकम, तानाजी सानप यांच्यासह ७० माजी लष्करी अधिकारी व जवानांचा सत्कार करण्यात आला. तसेच वीर पत्नी गितादेवी ब्रिजबिहारी तिवारी यांना साडीचोळी देऊन सन्मानीत करण्यात आले. यावेळी माजी लष्करी अधिकारी व जवानांची डॉ. विलासराव वाघ, मनदिप सिंग, भिमा कर्डीले, संपत कर्डीले, सुभाष पगारे, महेंद्र पोरजे, परिचारीका नायर, देशपांडे आदिंनी आरोग्य तपासणी केली. यावेळी आजारानुसार संबंधितास एक महिन्याची औषधे मोफत देण्यात आली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ. युवराज मुठाळ व आभार विक्रम कोठुळे यांनी मानले.
शहिदांना आदरांजली
कारगिल विजय दिनाचे औचित्य साधून आरंभ महाविद्यालयातील भारतीय सैन्याची शौर्यगाथा दाखविणारा ‘उरी द सर्जिकल स्ट्राइक’ हा चित्रपट दाखविण्यात आला. शाळा समितीचे अध्यक्ष जयंत मोंढे यांच्या हस्ते स्वातंत्र्यसैनिक परिवारातील राजेश पंडित यांचा सत्कार करण्यात आला. प्राचार्य दिलीप वाणी यांनी कारगिल युद्धाबाबत माहिती दिली. यावेळी शहीद जवानांना आदरांजली वाहण्यात आली. यावेळी उपप्राचार्य सुनील हिंगणे, नीलेश चव्हाण, बाळासाहेब काळे, प्रा. राजेंद्र शेळके, प्रा. राजेश खताळे, प्रा. संदीप गांगुर्डे आदी उपस्थित होते़

Web Title:  This country is a place of heroic soldiers ...

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.