नाशिक - महाराष्ट्रासह बहुराज्यीय कार्यक्षेत्र असलेल्या नाशिक मर्चंट को. ऑप. बँकेसाठी आज मतमोजणी सुरू झाली आहे.
सिडको येथील राजे संभाजी स्टेडियम येथे आज सकाळी मतपत्रिकांचे गठ्ठे तयार करण्यात येत असून त्यानंतर मतमोजणी सुरू होणार आहे. या निवडणुकीत माजी सत्ताधाऱ्यांच प्रगती तसेच विरोधकांचे सहकार तसेच नम्रता या पॅनलमध्ये यंदा चुरशीची लढत झाली. रविवारी झालेल्या मतदानात 1 लाख 76 मतदारांपैकी 63 हजार 839 मतदारांनी मतदान केले आहे.