मुलांच्या एकाग्रता वाढीसाठी राज्यातील शाळांमध्ये समुपदेशन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 13, 2018 00:47 IST2018-11-13T00:46:41+5:302018-11-13T00:47:10+5:30
वाढत्या ताणतणाव पूर्ण आयुष्यामुळे मन एकाग्र होत नाही, यामुळे समस्या निर्माण होऊन शारीरिक व मानसिक आरोग्यावर परिणाम होतो. विशेष म्हणजे अगदी बालवर्गातील मुलांपासून ते युवकांपर्यंत तणाव आणि नैराश्य याचे प्रमाण वाढले आहे. या समस्येवर प्रबोधन करण्यासाठी राज्यातील शाळांमध्ये मनशक्ती प्रयोग केंद्राद्वारे समुपदेशन उपक्र म राबविला जात आहे.

मुलांच्या एकाग्रता वाढीसाठी राज्यातील शाळांमध्ये समुपदेशन
नाशिक : वाढत्या ताणतणाव पूर्ण आयुष्यामुळे मन एकाग्र होत नाही, यामुळे समस्या निर्माण होऊन शारीरिक व मानसिक आरोग्यावर परिणाम होतो. विशेष म्हणजे अगदी बालवर्गातील मुलांपासून ते युवकांपर्यंत तणाव आणि नैराश्य याचे प्रमाण वाढले आहे. या समस्येवर प्रबोधन करण्यासाठी राज्यातील शाळांमध्ये मनशक्ती प्रयोग केंद्राद्वारे समुपदेशन उपक्र म राबविला जात आहे. चंचलता हा बालकांचा स्थायीभाव असून, वाढत्या वयानुसार मुले एकाग्र होऊन अभ्यासाकडे वळतात, हाच त्यांच्या जीवनाचा पाया असतो, असे बालमानसशास्त्रज्ञ स्पष्ट करतात. परंतु आजच्या काळात भरमसाठ इलेक्ट्रॉनिक्स माध्यमामुळे वाढत्या वयातही मुलांच्या अंगी असलेली चंचलता कायम राहून कोणत्याही एका गोष्टीत त्यांचे लक्ष लागत नाही. कालांतराने त्यांच्या मनात नैराश्य निर्माण होऊन साहजिकच अभ्यासावर विपरीत परिणाम होतो. त्यातून अपयश येण्याचा धोका वाढतो. या समस्येवर मात करण्यासाठी मनशक्ती प्रयोग केंद्र या संस्थेने राज्यभरातील शाळांमध्ये शाळांमध्ये विद्यार्थ्यांसाठी विनामूल्य समुपदेशन तसेच मार्गदर्शन वर्ग सुरू केले आहेत. विशेष म्हणजे यासाठी शाळांमधील शिक्षकांना या उपक्र मात सहभागी करून घेतले जात आहे. त्यांनाही यासंबंधी प्रशिक्षण देण्यात येत आहे. ज्या मुलांच्या बाबतीत वारंवार नैराश्यसारखी गंभीर समस्या असेल त्यांच्या पालकांसाठीदेखील अभ्यास वर्ग व कार्यशाळा घेण्यात येत आहेत. मनशक्ती प्रयोग केंद्राचे मुख्य कार्यालय लोणावळा येथे आहे. नाशिक शहरातील रचना विद्यालय, पुरु षोत्तम हायस्कूल, स्वामी विवेकानंद आदी शाळांमध्ये तीन ते पाच दिवसीय प्रशिक्षण कार्यशाळा, समुपदेशन वर्ग घेतल्याचे केंद्राच्या समन्वयकांनी सांगितले.
राज्यभरात ५० शहरांमध्ये उपक्रम
राज्यभरातील ५० शहरांत विविध ठिकाणी असलेल्या उपकेंद्रातील अनेक कार्यकर्ते गेल्या पाच वर्षांपासून सामाजिक बांधिलकीतून विविध उपक्र म राबवित आहेत. मुंबई, पुणे, औरंगाबाद, नागपूर, जळगाव, भुसावळ, धुळे, नाशिक आदी शहरांमधील शाळांमध्ये मनशक्ती केंद्राने राबवलेल्या मुलांच्या बाबतीत उपक्र मांचा सकारात्मक बदल घडून आला आहे.