नाशिकला कोथिंबिरीच्या बाजारभावात सुधारणा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 9, 2017 11:40 AM2017-12-09T11:40:15+5:302017-12-09T11:48:23+5:30

Correction to the market in Kothimabali, Nashik | नाशिकला कोथिंबिरीच्या बाजारभावात सुधारणा

नाशिकला कोथिंबिरीच्या बाजारभावात सुधारणा

googlenewsNext
ठळक मुद्दे१२ रुपये जुडी  आवक काही प्रमाणात घटली

नाशिक: गुरुवारी नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीत एक रुपया प्रतिजुडी भावाने विक्र ी झालेल्या कोथिंबिरीच्या बाजारभावात शुक्र वारी सुधारणा झाली. शुक्रवारी कोथिंबिरीला १२ रुपये प्रतिजुडी असा भाव मिळाला. बाजार समितीत शुक्र वारी कोथिंबीर मालाची आवक काही प्रमाणात घटली होती.
गुरुवारी बाजार समितीत कोथिंबिरीची मोठ्या प्रमाणात आवक झाली होती. एकीकडे आवक वाढलेली असताना दुसरीकडे मालाला उठाव नसल्याने कोथिंबिरीचे बाजार भाव घसरले होते. बाजारभाव घसरल्याने लागवडीचा व दळणवळणाचा खर्चही न सुटल्याने शेतकºयांनी नाराजी व्यक्त करून कोथिंबीर फेकून दिली होती. गुरुवारच्या तुलनेत शुक्रवारी सायंकाळी झालेल्या लिलावात कोथिंबिरीला चांगला बाजारभाव मिळाल्याने शेतकºयांनी समाधान व्यक्त केले. शुक्रवारी कोथिंबीर मालाची आवक काही प्रमाणात घटल्याने बाजारभावात सुधारणा झाली असल्याची माहिती सूत्रांनी दिली.

Web Title: Correction to the market in Kothimabali, Nashik

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.