शहरं
Join us  
Trending Stories
1
त्यांच्या कारकिर्दीत ‘ते’ म्हणतील ते सगळं केलं, आता भावनिक व्हायच नाही; अजित पवारांचा वार
2
IPL 2024 GT vs RCB: RCB चा 'विराट' शो! विल जॅक्सचे ४१ चेंडूत शतक; ४ ओव्हर राखून विजय
3
बारामती, शिरुरमध्ये पोलिसी बळाचा वापर, मतदारांना धमक्या; संजय राऊतांचा गंभीर आरोप
4
"मुस्लीम लोक सर्वाधिक कंडोम वापरतात..."; ओवेसींनी दिला केंद्राच्या डेटाचा हवाला, PM मोदींवर पलटवार
5
बीडमध्ये पंकजा मुंडे, मनोज जरांगे एकाच व्यासपीठावर; दोघांचाही एकमेकांना नमस्कार
6
BANW vs INDW: भारताची विजयी सलामी! बांगलादेश त्यांच्याच घरात ढेर; पाहुण्यांची सांघिक खेळी
7
ठाण्यात ऐन निवडणुकीत ठाकरेंची शिवसेना अडचणीत; एम. के. मढवींना अटक
8
माजी पंतप्रधानांच्या नातवाचे अश्लिल व्हिडीओ व्हायरल; निवडणूक होताच खासदार देशातून फरार
9
'अरे! तुमचं डोकं फुटलंय की सिलिंडर...'; बेंगलोर ब्लास्टवरून पंतप्रधान मोदी काँग्रेसवर बरसले 
10
माढ्याचा खासदार प्रत्येक वेळी नवा; आता कोण? परंपरा टिकणार की बदलणार?
11
IPL 2024 GT vs RCB : साई 'सु'दर्शन! शाहरूखही चमकला; युवा भारतीय खेळाडूंनी RCB ला धू धू धुतले
12
अनेक तासांचा प्रवास आता मिनिटांत! 'वंदे भारत' मेट्रोच्या रुपात येणार, कधी सुरू होणार? पाहा...
13
IPL 2024 GT vs RCB : "विराटच्या स्लो स्ट्राईक रेटबद्दल बोललं जातं पण...", इरफानची 'मन की बात'!
14
Narendra Modi : "राम मंदिर बांधण्याचा निर्णय देशाच्या स्वातंत्र्याच्या दुसऱ्याच दिवशी घ्यायला हवा होता"
15
'आप'च्या थीम साँगवर निवडणूक आयोगाचा आक्षेप; आतिशी म्हणाल्या, "त्यांनी हुकूमशाही केली तर योग्य, आम्ही गाणं लिहिलं तर चूक"
16
IPL 2024 GT vs RCB : WHAT A BALL सिराज! अखेर शाहरूख खानच्या घातक खेळीचा अंत
17
सांगलीत विशाल पाटलांना धक्का; चंद्रहार पाटील यांच्या प्रचारात विश्वजीत कदम सक्रिय
18
पवार कुटुंबातील आपल्या बाजूने कोण? सुप्रिया सुळेंच्या बाजूने कोण? आणि तटस्थ कोण? अजितदादांनी सविस्तर सांगितलं
19
'काँग्रेसची मुघल विचारसरणी, त्यांना औरंगजेबाचे अत्याचार आठवत नाहीत', PM मोदींचा हल्लाबोल
20
"मला त्याच्याकडून एकच गोष्ट शिकायचीय", गंभीरची 'विराट' बॅटिंग; ट्रोलर्सला दिलं प्रत्युत्तर!

नगरसेवक संतप्त : पूर्व विभागातील पाणीप्रश्नावर चर्चा अतिक्रमणे हटविली जात नाहीत मग प्रभाग समित्या कशाला?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 29, 2017 1:51 AM

इंदिरानगर : अतिक्रमणे हटविली जात नाहीत आणि पाणीप्रश्न निकालात निघत नसल्याने महापालिकेच्या पूर्व प्रभाग समितीच्या सभेत सदस्यांनी प्रशासनाला जाब विचारला. महापौर व आयुक्तांकडे तक्रार केल्यावरच कामे होत असतील तर प्रभाग सभा काय उपयोगाच्या आहेत, असा प्रश्नही सदस्यांनी केला.

ठळक मुद्देदगड आणि माती-सीमेंटचा मलबा तसाचअनधिकृत झोपड्या व टपºया वाढल्या

इंदिरानगर : अतिक्रमणे हटविली जात नाहीत आणि पाणीप्रश्न निकालात निघत नसल्याने महापालिकेच्या पूर्व प्रभाग समितीच्या सभेत सदस्यांनी प्रशासनाला जाब विचारला. महापौर व आयुक्तांकडे तक्रार केल्यावरच कामे होत असतील तर प्रभाग सभा काय उपयोगाच्या आहेत, असा प्रश्नही सदस्यांनी केला.पूर्व प्रभाग सभा सभापती शाहीन मिर्झा यांच्या अध्यक्षतेखाली झाली. यावेळी प्रभाग ३० मधील वडाळागावातील १०० फुटी रस्त्याच्या रुंदीकरणास अडथळा ठरणाºया अनधिकृत झोपड्या काढल्या, परंतु अद्यापही दगड आणि माती-सीमेंटचा मलबा तसाच आहे, अशी तक्रार डॉ. दीपाली कुलकर्णी यांनी केली. तसेच महापालिकेच्या आरक्षित जागेवर तातडीने संरक्षक भिंत बांधावी अन्यथा अतिक्रमण पुन्हा होईल, असे कुलकर्णी यांनी सांगितले. वडाळागावातील जसे अतिक्रमण काढले तसेच राजीवनगर झोपडपट्टीलगतच्या १०० फुटी रस्त्याच्या पदपथावर दोन्ही बाजूस मोठ्या प्रमाणात अनधिकृत झोपड्या व टपºया वाढल्या आहेत त्या तातडीने काढाव्या, अशी सूचना सतीश सोनवणे यांनी केली. शंभर फुटी रस्ता, राजीवनगर झोपडपट्टी केव्हा श्वास घेईल, असा प्रश्नही सोनवणे यांनी केला. महापौर व आयुक्तांकडे तक्रार केली तर लगेच कामे होतात; प्रभाग सभेत नागरिकांच्या समस्या पोटतिडकीने सांगूनही कामे होत नाहीत, अशी तक्रार बडोदे यांनी केली. वडाळागावातील अतिक्रमण काढलेल्या ठिकाणी संथगतीने कामे सुरू आहेत, असे बडोदे म्हणाले. तसेच वडाळागावातील अतिक्रमण काढण्यापूर्वी तेथील नळजोडणीचे नियोजन न केल्यामुळे हजारो लिटर पाण्याचा अपव्यय झाला. तसेच परिसरात काही ठिकाणी पाणीपुरवठाही बंद झाल्याची तक्रार सुप्रिया खोडे यांनी केली. तसेच गावातील शौचालयामधील घाण रस्त्यावर वाहत असल्याने नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे, असे खोडे यांनी सांगितले. सावरकर उद्यानाची देखभालीअभावी दयनीय अवस्था झाल्याची तक्रार अजिंक्य साने यांनी केली. तसेच जॉगिंग ट्रॅक येथील धार्मिक स्थळ काढले परंतु अद्यापही तेथील मलबा उचलण्यात आलेला नाही. तसेच रस्त्यांचे कामही सुरू केलेले नाही, असे साने यांनी सांगितले. यावेळी सुमारे ३३ लाखांच्या विविध विकासकामांना मंजुरी देण्यात आली.