coronavirus : नाशिकमध्ये आणखी चार कोरोनाबाधित
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 24, 2020 20:43 IST2020-04-24T20:43:27+5:302020-04-24T20:43:53+5:30
गेल्या पाच दिवसांपासून एकही रुग्ण न आढळलेल्या नाशिक शहरात आज एक कोरोना बाधित आढळला आहे.

coronavirus : नाशिकमध्ये आणखी चार कोरोनाबाधित
नाशिक- गेल्या पाच दिवसांपासून एकही रुग्ण न आढळलेल्या नाशिक शहरात आज एक कोरोना बाधित आढळला आहे. त्यामुळे नाशिक शहरातील रुग्ण संख्या 11 झाली आहे. आज सायंकाळी आणखी चार कोरोना बाधित असून यात मालेगावात दोन तर येवला येथील एका बधिताचा समावेश आहे.
नाशिक शहरात आज आढळलेला रुग्ण मूळचा या शहरातील नाही. मुंबईतील मानखुर्द येथून भंडारा जिल्ह्यात संबंधित रुग्ण जात असताना 22 एप्रिल रोजी त्यास नाशिक रोड पोलिसांनी पकडले होते.
त्याच्यासोबत तब्बल अकरा जण होते. पोलिसांनी पकडून त्यांना कथडा येथील डॉ झाकीर हुसेन रुग्णालयामध्ये उपचारासाठी दाखल केले आहे. त्यांचे नमुने घेण्यात आले. त्यातील एक कोरोना बाधित असल्याचे स्पष्ट झाले आहे. त्याच्या सोबत असलेले 11 जण आधीच रुग्णालयात दाखल असल्यामुळे चिंतेचे कारण नाही असे महापालिकेचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. राजेंद्र त्रंबके यांनी सांगितले.