शहरं
Join us  
Trending Stories
1
बांगलादेशात रस्त्यांना छावणीचं स्वरूप, मोहम्मद युनूस यांच्या घराबाहेर मोठा फौज फाटा; जाणून घ्या संपूर्ण प्रकरण
2
हत्येनंतर शीर अन् धड वेगळे केले, सुटकेसमध्ये मृतदेह लपवून फरार; अखेर १६ वर्षांनी आरोपीला अटक
3
'मी पुन्हा येईन! १४ नोव्हेंबरला विजय निश्चित'; बिहारच्या शेवटच्या सभेतून पंतप्रधान मोदींचा ठाम दावा
4
बँका, पतपेढ्यांमधून निघणारा पैसा निवडणूक आयोगाच्या रडारवर, स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीसाठी तयारी
5
शून्य रुपयांच्या विश्वासावर ३०० कोटींचा व्यवहार, रक्कम कशी केव्हा मिळेल याचा खरेदीखतात उल्लेखच नाही; एसआयटी करणार तपास
6
"मला पुढच्या जन्मी गोविंदा पती म्हणून नकोय...", सुनीता अहुजाचं वक्तव्य चर्चेत, म्हणाली- "हा एकच जन्म..."
7
लोक प्रवाशांच्या जीवावर कोण उठले? सँडहर्स्ट रोड अपघाताची चौकशी जीआरपीकडे
8
ट्रॉलरसह आठ मच्छीमारांचे पाकिस्तानकडून अपहरण?
9
विकृत इसमाने मांजरावर केला अतिप्रसंग; मुंबईतील धक्कादायक घटना
10
आजचे राशीभविष्य,०९ नोव्हेंबर २०२५: कुटुंबीयांशी मतभेद होतील; शक्यतो नवीन कार्याची सुरुवात करु नये
11
केवळ पत्नी रडायची, म्हणून पतीला क्रूरतेसाठी दोषी ठरवू शकत नाही: उच्च न्यायालय
12
संसदेचे हिवाळी अधिवेशन १ ते १९ डिसेंबरदरम्यान
13
आज 'कोंडीवार'; सेंट्रल लोकलने जाणाऱ्यांनो सावधान!
14
आफ्रिकेचे आणखी ८ चित्ते लवकरच येणार भारतात
15
बिहारमध्ये झालेले विक्रमी मतदान कोणाच्या बाजूने? एनडीए आणि महाआघाडीत रस्सीखेच, पहिल्या टप्प्यात ६१.७८% मतदान
16
मनोज जरांगे यांना मुंबई पोलिसांचे समन्स; सोमवारी हजर राहण्याचे निर्देश
17
साप्ताहिक राशीभविष्य: ६ राशींना लाभ, ६ राशींना अवघड काळ; उत्तम धनलाभ, पण पैसे उसने देऊ नका!
18
'मेक इन लातूर'; 'वंदे भारत'चा स्लीपर कोच जूनपासून रुळांवर धावणार, देखभाल दुरुस्ती राजस्थानला होणार
19
बिहार निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तेज प्रताप यांना वाय प्लस सुरक्षा, गृह मंत्रालयाने घेतला मोठा निर्णय
20
वादग्रस्त पोस्ट मास्तर जनरल मधाळे निलंबित, अधिनस्थ अधिकाऱ्याचा छळ, चिमटे अन् गुदगुल्या भोवल्या

coronavirus: नाशकातील ३६ पोलिसांना कोरोनाची बाधा, शहरातील २५ तर ग्रामिणमध्ये ११ पोलिसांचा समावेश

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 15, 2021 22:39 IST

शहर व परिसरात कोरोनाचा प्रादूर्भाव वाढू लागताच त्याचा फटका शहर व ग्रामीण पोलीस दलाला पुन्हा बसताना दिसत आहे. या दोन्ही दलाचे मिळून सोमवारपर्यंत (दि.१५) ३६ पोलिसांना कोरोनाची बाधा झाल्याचे चाचणीअंती स्पष्ट झाले आहे.

नाशिक - शहर व परिसरात कोरोनाचा प्रादूर्भाव वाढू लागताच त्याचा फटका शहर व ग्रामीण पोलीस दलाला पुन्हा बसताना दिसत आहे. या दोन्ही दलाचे मिळून सोमवारपर्यंत (दि.१५) ३६ पोलिसांना कोरोनाची बाधा झाल्याचे चाचणीअंती स्पष्ट झाले आहे. यामध्ये शहर पोलीस आयुक्तालयातील २५ तर ११ ग्रामीण पोलिसांचा समावेश आहे. दरम्यान, आयुक्तालयांतर्गत उभारण्यात आलेले पोलीस कोविड केअर सेंटर पुन्हा सुरु होण्याची चिन्हे दिसू लागली आहेत. (36 cops hit in Nashik, 25 in urban areas and 11 in rural areas)

एकीकडे पुन्हा फैलावणारा कोरोनाचा प्रादूर्भाव तर दुसरीकडे कायदासुव्यवस्था राखण्याचे कर्तव्य बजावण्याची जबाबदारी पार पाडण्यासाठी पोलीस दिवसरात्र रस्त्यावर आहेत. पोलिसांच्या कामाचा ताण आता पुन्हा वाढताना दिसत आहे; मात्र अशास्थितीत कोरोनाची लागण होण्यापासून स्वत:ला सुरक्षित ठेवणे पोलिसांकरिता जिकरिचे ठरु लागले आहे. शहराभोवती कोरोनाचा विळखा घट्ट होऊ पाहत असतानाच पोलिसांनाही या आजाराची बाधा होऊ लागली आहे. शहर पोलीस दलातील ४ पोलीस अधिकारी व ११ अंमलदार आतापर्यंत कोरोनाबाधित असल्याचे आढळून आले आहेत. त्याचप्रमाणे ग्रामीण पोलीस दलातही कोरोनाने पुन्हा शिरकाव केला आहे. तेथे ११ पोलीस बाधित आढळून आले आहेत. बाधित पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांवर उपचार सुरु आहेत. सर्वांची प्रकृती स्थिर असल्याचे पोलीस प्रशासकीय सुत्रांनी सांगितले. दरम्यान, मास्क, सामाजिक अंतर आणि सॅनिटायझरचा पुरेपुर वापरावर पुन्हा भर देण्यास सुरुवात करण्यात आली आहे.पोलीस ठाण्यांना ‘कोरोना ॲलर्ट’मागील वर्षाप्रमाणेच यावर्षीही आयुक्तालयातील सर्वच पोलीस ठाण्यांना ‘ॲलर्ट’ करत कोरोना आजाराला रोखण्यासाठी आपआपल्या पोलीस ठाण्यांमध्ये अधिकाधिक खबरदारी घेण्याच्या सुचना वरिष्ठ स्तरावरुन करण्यात आल्या आहेत. कर्मचाऱ्यांना मास्कचा नियमित वापर बंधनकारक करण्यात आला आहे.

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसcorona virusकोरोना वायरस बातम्या