जिजाऊ ब्रिगेडतर्फे कोरोनायोद्ध्यांचा सन्मान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 20, 2020 00:15 IST2020-07-20T00:15:27+5:302020-07-20T00:15:49+5:30

मालेगाव येथील जिजाऊ ब्रिगेडतर्फे कोरोनायोद्धा सन्मान कार्यक्रम घेण्यात आला. कोरोनायोद्ध्यांना बॅच देऊन सत्कार करण्यात आला. अध्यक्षस्थानी विजयालक्ष्मी अहिरे होत्या.

Coronation warriors honored by Jijau Brigade | जिजाऊ ब्रिगेडतर्फे कोरोनायोद्ध्यांचा सन्मान

मालेगावी जिजाऊ ब्रिगेडतर्फे कोरोनायोद्ध्यांच्या सन्मानाप्रसंगी डॉ. शैलेश निकम, डॉ. राहुल देशमुख, शिल्पा देशमुख, डॉ. देवेंद्र निकम, डॉ. नीरज बच्छाव आदी.

मालेगाव : येथील जिजाऊ ब्रिगेडतर्फे कोरोनायोद्धा सन्मान कार्यक्रम घेण्यात आला. कोरोनायोद्ध्यांना बॅच देऊन सत्कार करण्यात आला.
अध्यक्षस्थानी विजयालक्ष्मी अहिरे होत्या. प्रमुख अतिथी म्हणून जिजाऊ ब्रिगेड जिल्हाध्यक्ष शिल्पा देशमुख, नगरसेवक गिरीश बोरसे, प्रा. अनिल पाटील उपस्थित होते. यावेळी शिल्पा देशमुख यांनी मनोगत व्यक्त केले. मालेगाव पंचायत समिती आरोग्य विभागाला सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले.
यावेळी तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. शैलेशकुमार निकम, डॉ. राहुल देशमुख, डॉ. देवेंद्र निकम, डॉ. नीरज बच्छाव, डॉ. मीनाज पटेल, डॉ. स्विटी करडे, अण्णा शिंदे यांचा सत्कार करण्यात आला. कोरोनाकाळात सामाजिक संघटन म्हणून दाभाडीसह शहरात उल्लेखनीय कार्य केले याबद्दल मराठा महासंघ शाखा दाभाडीचा सन्मानचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला.

Web Title: Coronation warriors honored by Jijau Brigade