Coronation at Rakshabandhan festival in Alangun area | अलंगुण परिसरात रक्षाबंधन सणावर कोरोनाचे सावट

अलंगुण परिसरात रक्षाबंधन सणावर कोरोनाचे सावट

ठळक मुद्देकाहींनी आपल्या बहिणीला मेसेज करून आॅनलाईन राखीचे धागे बांधले.

अलंगुण : भाऊ-बहिणींचे प्रेम व ऋ णानुबंध वाढवणारा सण म्हणजे रक्षाबंधन. या पवित्र व स्नेहाच्या सणावर अलंगुण परिसरात कोरोना विषाणूचे सावट दिसून आले. त्यामुळे अतिशय साधेपणाने रक्षाबंधन साहळा पार पडला.
सध्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर बऱ्याच गावात परक्या माणसांसाठी व बाहेर गावच्या पाहुण्यांसाठी बंदी केली आहे. तसेच अनलॉकडाऊनमुळे ग्रामीण भागात खाजगी व सार्वजनिक वाहतूक व्यवस्थाही कोलमडली आहे. या सर्व गोष्टींचा परिणाम या वर्षाच्या रक्षाबंधनावर दिसून आला.
कोरोना विषाणूचा वाढता संसर्ग लक्षात घेता रक्षाबंधन साजरा करण्यासाठी फोनवर बोलून तर काहींनी आपल्या बहिणीला मेसेज करून आॅनलाईन राखीचे धागे बांधले. तसेच जेथे आहेत तेथेच सुरक्षित रहाण्याचे व आरोग्यविषयक काळजी घेण्याचे सल्ले गावापासून दूर असलेल्या भावा-बहिणांनी एकमेकांना दिले.

Web Title: Coronation at Rakshabandhan festival in Alangun area

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.