शहरं
Join us  
Trending Stories
1
समुद्रात पेरल्या जाताहेत मृत्यूच्या खाणी! ट्रम्प यांच्या 'प्लॅन २' मुळे इराणची झोप उडाली; जगाचं टेन्शन वाढलं
2
मोठी बातमी! RBI कडून पेटीएमचा बँकिंग परवाना कायमचा रद्द; युजर्सवर काय परिणाम होणार...
3
इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांना कर्करोग! स्वतःच केला धक्कादायक खुलासा; आता कशी आहे तब्येत?
4
पुण्यात भरवर्दळीत सलूनमध्ये घुसून गोळीबार; दोघे जखमी
5
चार मुले जन्माला घाला, त्यातील एक संघाला द्या; बागेश्वर धामचे धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांच्या विधानावरून नव्या वादाची चिन्हं
6
Travel : चक्क लाटा बाजूला सारून दर्या दुभंगतो; समुद्राच्या पोटातून रस्ता जातो! कुठे आहे ही जागा?
7
आप फुटली, भाजपाची ताकद वाढली! राज्यसभेत आता कोणत्या पक्षाचे किती खासदार?
8
Travel : आयआरसीटीसीची पुरी, कामाख्या बैद्यनाथ तसेच दिव्य दक्षिण यात्रा; पुणे आणि नागपुरातून प्रारंभ 
9
'आप'ला भगदाड, खासदारांचा मोठा गट फुटला! अरविंद केजरीवाल म्हणाले, "भाजपाने पुन्हा..."
10
नेपाळमध्ये भारतीय भाविकांच्या बसला अपघात; २१ जण जखमी, ६ वर्षांच्या चिमुरडीसह एका महिलेचा मृत्यू
11
तरुणीला 'हाय' केले अन् वाद पेटला; लग्नातील वऱ्हाडी थेट २० फूट खड्ड्यात, एकाचा मृत्यू ८ जण जखमी, विकासकाविरुद्ध गुन्हा 
12
Latest Marathi News LIVE Updates: आम आदमी पक्षाला मोठा धक्का; राज्यसभेचे ७ खासदार फुटले, भाजपात प्रवेश करणार
13
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमारांना हटवण्याची मागणी; ७३ खासदारांचे सभापतींना पत्र
14
९०% मार्क्स, आयआरएससोबत वडिलांची ओळख अन् लक्झरी लाईफचं वेड; हुशार राहुल मीणा गुन्हेगार कसा झाला?
15
Raghav Chadha: राघव चड्ढा, हरभजनसिंग भाजपात! आम आदमी पार्टीत उभी फूट, राज्यसभेच्या १० पैकी ७ खासदारांचा पक्षाला 'राम-राम'
16
Raghav Chadha : राघव चड्ढांनी २१ दिवसांपूर्वीच दिले होते 'आप'मधील फुटीचे संकेत; भाकीत ठरलं खरं
17
“रिक्षा-टॅक्सी, ओला-उबेर, रॅपिडो चालकांनी मराठीत संवाद साधलाच पाहिजे”: मंत्री प्रताप सरनाईक
18
एकदम फिट दिसणाऱ्यांना का येतोय हार्ट अटॅक? डॉक्टरांनी सांगितलं 'ते' खरं कारण
19
'नरक' म्हणणाऱ्या डोनाल्ड ट्रम्प यांना चीनचे भारताचा झेंडा पोस्ट करत उत्तर; 'शब्द विरून जातात, पण...'
20
LPG Subsidy : तुमच्या सिलिंडरचं अनुदान खात्यात जमा होतंय का? घरबसल्या स्टेटस तपासण्याची सोपी पद्धत
Daily Top 2Weekly Top 5

कोरोनाची धास्ती, विद्यार्थ्यांची घटली उपस्थिती!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 24, 2021 00:52 IST

पिंपळगाव बसवंत : आठ दिवसांपासून कोरोना रुग्णांच्या संख्येत होणाऱ्या वाढीचा परिणाम शाळांच्या उपस्थितीवर जाणवायला लागला असून, ४० टक्के उपस्थिती घटली असल्याची परिस्थिती शाळांमध्ये दिसून येत आहे. प्रशासनाने शाळा बंदचे कोणतेही आदेश दिले नाहीत. मात्र, पालकवर्गाकडून आपल्या पाल्याला कोरोनाचा संसर्ग होऊ नये म्हणून खबरदारी घेत शाळेत न पाठविण्याचा निर्णय घेतला जात आहे.

ठळक मुद्देग्रामीण भागातील वास्तव : पालकांकडूनच खबरदारीचा उपाय

पिंपळगाव बसवंत : आठ दिवसांपासून कोरोना रुग्णांच्या संख्येत होणाऱ्या वाढीचा परिणाम शाळांच्या उपस्थितीवर जाणवायला लागला असून, ४० टक्के उपस्थिती घटली असल्याची परिस्थिती शाळांमध्ये दिसून येत आहे. प्रशासनाने शाळा बंदचे कोणतेही आदेश दिले नाहीत. मात्र, पालकवर्गाकडून आपल्या पाल्याला कोरोनाचा संसर्ग होऊ नये म्हणून खबरदारी घेत शाळेत न पाठविण्याचा निर्णय घेतला जात आहे.राज्यात करोनाचा प्रादुर्भाव काहीसा कमी होताच शिक्षण विभागाने पहिल्या टप्प्यात इयत्ता नववी ते बारावी आणि दुसऱ्या टप्प्यात इयत्ता पाचवी ते आठवीच्या शाळा सुरू केल्या. १५ फेब्रुवारीपासून शहरातील महाविद्यालयेही सुरू करण्यात आली. मात्र, महाविद्यालयांकडे विद्यार्थ्यांनी सध्यातरी पाठ फिरवली आहे. याउलट ग्रामीण भागातील शाळा, महाविद्यालयांतील उपस्थिती समाधानकारक आहे. मात्र, कोरोना रुग्णांच्या संख्येमध्ये लक्षणीय वाढ होत असल्याने शाळा प्रशासन आणि पालकांमध्येही भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.                                            याचा परिणाम विद्यार्थ्यांच्या उपस्थितीवर दिसत आहे. त्यामुळे काही शाळांनी तोंडी सूचना देत विद्यार्थ्यांना ऑनलाइन वर्गाला उपस्थित राहण्यास सांगितले आहे. शाळेतील एखादा विद्यार्थी किंवा त्याच्या परिवारातील व्यक्तीचा कोरोना अहवाल सकारात्मक असल्यास पूर्ण शाळाच बंद होण्याची शक्यता आहे. त्यामुळे शाळा प्रशासन खबरदारी म्हणून आपला मोर्चा पुन्हा ऑनलाइन वर्गाकडे वळवेल, असे वातावरण सध्यातरी निर्माण होताना दिसत आहे.                               मात्र, रुग्ण वाढू नयेत व आपण आणि आपली शाळा सुरक्षित राहावी यासाठी पालक, शिक्षक आणि विद्यार्थांनी शासनाने नमूद केलेल्या नियमांचे पालन करणे गरजेचे आहे; अन्यथा पुन्हा शाळा ओस पडण्याची भीती व्यक्त केली जात आहे.विद्यार्थी, शिक्षक आणि संपूर्ण शाळा सुरक्षित राहावी यासाठी शाळा प्रशासनाकडून शासनाने नमूद केलेल्या कोरोना नियमांचे काटेकोरपणे नियम पाळले जात आहेत. त्यात शाळा, वर्गखोल्या स्प्रे मारून सॅनिटाइझ करणे, माक्सचा नियमित वापर करणे, फिजिकल डिस्टन्स ठेवणे आदी सुरक्षितता राबवून विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास कसा होईल यावर भर दिला जात आहे. पालकांनीही घाबरून न जाता आपल्या मुलाला कोरोनाचे नियम व्यवस्थित समजावून ते अमलात आणण्यासाठी प्रयत्न करणे गरजेचे बनले आहे. 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याSchoolशाळा