शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB चा 'विराट' विजय! प्ले ऑफच्या शर्यतीत इतरांच्या जीवावर उभे, पण PBKS ला बाहेर फेकले
2
वैजयंतीमाला, चिरंजीवी यांच्यासह १३२ विजेत्यांना राष्ट्रपतींच्या हस्ते पद्म पुरस्कार प्रदान
3
गंमत-जंमत केली तर खपवून घेणार नाही, मीच बंदोबस्त करेन; अजित पवारांनी दिला सज्जड दम
4
सेनेगलमध्ये ८५ प्रवाशांनी भरलेले विमान धावपट्टीवरून घसरले, लागली आग; मोठी दुर्घटना टळली!
5
रायली रुसोने फिफ्टी मारून बॅट उंचावली, विराट कोहलीने विकेट पडताच खोड काढली
6
भारतीय प्रवाशांनी भरलेलं विमान या देशानं माघारी पाठवलं! नेमकं काय घढलं? सरकारनं सांगितलं
7
जंगल सफारीला निघाला क्रिकेटचा देव! Sachin Tendulkar ने शेअर केले जिम कॉर्बेट नॅशनल पार्कमधील निसर्गरम्य Photos
8
मुंबईची लोकसभा निवडणूक आता भारत-पाकिस्तान लढाई झालेली आहे; भाजपाचे मविआवर टीकास्त्र
9
स्ट्राइक रेटवरून विराट कोहलीची अप्रत्यक्षपणे पुन्हा गावस्करांना कोपरखळी, म्हणाला...  
10
मतदान झालं, बारामतीत लीड कोणाला?; सुनेत्रा पवारांच्या विजयाबद्दल अजित पवार म्हणाले...
11
विराट कोहलीला शतकाची हुलकावणी, पण RCB ची आतषबाजी; PBKS समोर २४२ धावांचे लक्ष्य
12
यशाची गॅरंटी; 'पुष्य नक्षत्र' असेल PM मोदींसाठी खास, 'या' दिवशी उमेदवारी अर्ज भरणार...
13
शिवसेना नेते सुरेशदादा जैन यांचा उद्धवसेनेच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा
14
"खलिस्तानवर नियंत्रण ठेवण्याची गरज", ब्रिटनच्या NSA सोबत अजित डोवालांची चर्चा
15
ही निवडणूक राहुल गांधी vs नरेंद्र मोदी अन् जिहाद विरुद्ध...; अमित शाह यांचा मोठा हल्ला
16
PBKS vs RCB सामन्यात गारांचा पाऊस! सामना झालाच नाही तर कोण होईल 'गार'? चाहत्यांची वाढलीय चिंता
17
"अदानी, अंबानींची चौकशी करा; सत्य बाहेर येईल"; पंतप्रधान मोदींच्या टीकेवर काँग्रेसकडून पलटवार
18
धक्कादायक! चार दिवसांत दोन मातांनी गमावले प्राण, अहेरीत आरोग्यसेवेचा बोजवारा
19
तुफान राडा अन् लाथा-बुक्क्यांची जुगलबंदी! बसच्या दरवाज्यात दोन महिलांमध्ये तुंबळ हाणामारी (Video)
20
अब की बार, मतदान जोरदार!... कोल्हापुरातील वाढलेला टक्का कुणाला देणार धक्का? 

पोलीस अकॅडमीमध्ये कोरोनाचा शिरकाव; १६७ प्रशिक्षणार्थींना झाली विषाणूची बाधा

By ऑनलाइन लोकमत | Published: December 25, 2020 5:25 AM

CoronaVirus News : आठ दिवसांत महापालिकेच्या आरोग्य विभागाकडून एकूण ८९४ संशयितांची कोविड-१९ ची चाचणी करण्यात आली असून, त्यापैकी आतापर्यंत १६७ प्रशिक्षणार्थी कोरोना पॉझिटिव्ह आढळून आले आहेत.

नाशिक : येथील महाराष्ट्र पोलीस अकॅडमीमध्ये कोरोनाचा शिरकाव झाला असून तब्बल १६७ प्रशिक्षणार्थी पोलीस उपनिरीक्षकांना कोरोनाची लागण झाल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. आठ दिवसांत महापालिकेच्या आरोग्य विभागाकडून एकूण ८९४ संशयितांची कोविड-१९ ची चाचणी करण्यात आली असून, त्यापैकी आतापर्यंत १६७ प्रशिक्षणार्थी कोरोना पॉझिटिव्ह आढळून आले आहेत. यामधील १२७ रुग्णांवर  कोविड सेंटरमध्ये उपचार सुरू आहेत.लॉकडाऊनपासून पोलीस अकॅडमीमधून प्रशिक्षणार्थी उमेदवारांपासून स्वयंपाकीसह चतुर्थश्रेणीतील सर्व कर्मचारीवर्गाला मुख्य उंबरठा ओलांडण्यास मज्जाव केला आहे. बाहेरून येणाऱ्या वाहनांना अकॅडमीच्या प्रवेशद्वारावरच निर्जंतुक करून प्रवेश दिला जात आहे. अधिकारीवर्गाला तपासणी करून प्रवेश दिला जात आहे. प्रशिक्षण कालावधी लांबणारकोरोनाचा शिरकाव झाल्यामुळे येत्या जानेवारीमध्ये पूर्णत्वास येणाऱ्या पोलीस उपनिरीक्षकांच्या २०२० च्या बॅचचा प्रशिक्षण कालावधीसुद्धा आता लांबणीवर पडण्याची शक्यता आहे.   मागील काही महिन्यांपासून  प्रशिक्षण थांबले आहे.

लग्नाला जाणे ‘महाग’ - नातेवाइकाच्या लग्नासाठी एक प्रशिक्षणार्थी प्रवास करून आल्यानंतर कोरोनाचा शिरकाव अकॅडमीमध्ये झाल्याची चर्चा.  - कोरोनाचा शिरकाव मागील आठवडाभरापूर्वीच अकॅडमीमध्ये झाला असून, येथील प्रशिक्षक, प्रशिक्षणार्थी, अधिकारी, कर्मचारी यांना तोंडावर मास्क, हातमोजे व सॅनिटायझरचा वापर बंधनकारक करण्यात आला आहे. बहुतांश संशयितांना विलगीकरणातही ठेवण्यात आल्याचे समजते. 

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसNashikनाशिक