दिंडोरी तालुक्यात कोरोनाची डोकेदुखी वाढली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 19, 2020 00:42 IST2020-07-18T21:17:11+5:302020-07-19T00:42:50+5:30
लखमापूर : दिंडोरी तालुक्यातील लखमापूर येथे दोन कोरोनाबाधित रु ग्णांची भर पडल्याने खळबळ उडाली असून, ग्रामीण भागात कोरोनाची दहशत वाढू लागली आहे.

दिंडोरी तालुक्यात कोरोनाची डोकेदुखी वाढली
लखमापूर : दिंडोरी तालुक्यातील लखमापूर येथे दोन कोरोनाबाधित रु ग्णांची भर पडल्याने खळबळ उडाली असून, ग्रामीण भागात कोरोनाची दहशत वाढू लागली आहे.
परिस्थितीवर तालुका आरोग्य अधिकारी डॉ. सुजित कोशिरे यांच्या मार्गदर्शनाखाली डॉ. योगेश देवरे, आशा कर्मचारी अनिता पांडव, उज्ज्वला सोनवणे, शालिनी बलसाने, सुनीता शिरसाठ, तलाठी नंदकुमार गोसावी, ग्रामविकास अधिकारी संजय पाटील व ग्रामपंचायत कर्मचारी परिस्थितीवर नियंत्रण ठेवून आहेत. लखमापूर गावात ग्रामपंचायत कार्यालयाकडून दररोज जंतुनाशक औषधांची फवारणी केली जात आहे. बाधित रुग्ण आढळलेला परिसर सील करण्यात आला आहे. नागरिकांना कामाशिवाय घराबाहेर न पडण्याचे तसेच घरांबाहेर पडणाऱ्यांनी मास्क, सॅनिटायझरचा वापर करणे, शारीरिक अंतर पाळण्याचे आवाहन आरोग्य विभागाच्या वतीने करण्यात येत आहे.