देवळालीत कोरोनाचा पहिला बळी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 20, 2020 23:20 IST2020-06-20T23:20:35+5:302020-06-20T23:20:50+5:30

देवळाली कॅम्प : शहराच्या मिठाई स्ट्रीट परिसरात एका ६५ वर्षीय महिलेचा कोरोनामुळे मृत्यू झाल्याने परिसरात भीतीचे वातावरण पसरले असून, प्राप्त झालेल्या ३२ पैकी दहा जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आल्याने कॅन्टोन्मेंट बोर्डाकडून तत्काळ बाधित आढळलेल्या परिसरात सॅनिटायझेशन सुरू करण्यात आले आहे.

Corona's first victim at the temple | देवळालीत कोरोनाचा पहिला बळी

देवळालीत कोरोनाचा पहिला बळी

ठळक मुद्देपोलिसांनी कंटेन्मेंट झोन जाहीर करून संबंधित परिसर सील केला

देवळाली कॅम्प : शहराच्या मिठाई स्ट्रीट परिसरात एका ६५ वर्षीय महिलेचा कोरोनामुळे मृत्यू झाल्याने परिसरात भीतीचे वातावरण पसरले असून, प्राप्त झालेल्या ३२ पैकी दहा जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आल्याने कॅन्टोन्मेंट बोर्डाकडून तत्काळ बाधित आढळलेल्या परिसरात सॅनिटायझेशन सुरू करण्यात आले आहे.
देवळाली कॅम्प परिसरात दोन महिन्यांपूर्वी लष्करातील मेजर दर्जाच्या अधिकाऱ्याच्या निवासस्थानी काम करणाºया इसमास कोरोनाची लागण झाल्यानंतर कॅन्टोन्मेंट प्रशासन व पोलिसांनी कंटेन्मेंट झोन जाहीर करून संबंधित परिसर सील केला होता. लॉकडाऊनचे तंतोतंत पालन होत असल्याने शहरात कोरोनाचा संसर्ग रोखला गेला होता. मात्र अनेक रस्ते खुले केल्याने शहर परिसरात तब्बल आठ कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले आहे.

Web Title: Corona's first victim at the temple