सटाण्यात कोरोनाचा पहिला बळी, रूग्णसंख्या २८ वर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 9, 2020 00:36 IST2020-07-08T21:38:25+5:302020-07-09T00:36:53+5:30
सटाणा : शहरात बुधवारी कोरोनाचा पहिला बळी गेला आहे. ६० वर्षीय बाधित महिलेचा उपचारादरम्यान मृत्यू झाला असून, तालुक्यात बळींची संख्या आता तीनवर गेली आहे. शहरासह तालुक्यात कोरोनाबाधितांच्या संख्येत वाढ होत असून, उपचार घेत असलेल्या बाधितांची संख्या आता २८वर पोहोचली आहे.

सटाण्यात कोरोनाचा पहिला बळी, रूग्णसंख्या २८ वर
सटाणा : शहरात बुधवारी कोरोनाचा पहिला बळी गेला आहे. ६० वर्षीय बाधित महिलेचा उपचारादरम्यान मृत्यू झाला असून, तालुक्यात बळींची संख्या आता तीनवर गेली आहे. शहरासह तालुक्यात कोरोनाबाधितांच्या संख्येत वाढ होत असून, उपचार घेत असलेल्या बाधितांची संख्या आता २८वर पोहोचली आहे. रुग्णसंख्या वाढत असल्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. शहरातील भुतेकर चौकातील साठवर्षीय महिलेला कोरोनाची बाधा झाली होती. बुधवारी (दि. ८) सकाळी त्या महिलेचे उपचारादरम्यान निधन झाले आहे. आज प्राप्त झालेल्या वैद्यकीय अहवालात गांधी चौकातील तसेच मृत महिलेला संपर्कात आलेल्या त्यांच्या कुटुंबातील तिघे कोरोनाबाधित असल्याचे निष्पन्न झाले आहे. त्यामुळे सटाणा शहरात बाधितांची संख्या आता तेरावर पोहोचली आहे तर सटाणा शहरासह तालुक्यात उपचार घेत असलेल्या बाधितांची संख्या २८ वर पोहोचली आहे. मंगळवारी ४० जणांचे स्वॅब तपासणीसाठी नाशिक येथे पाठविण्यात आले आहे.
-------------------
तालुक्यात एकूण ४७२ जणांचे स्वॅब तपासणीसाठी पाठविण्यात आले होते. त्यापैकी ९३ बाधित असल्याचे निष्पन्न झाले होते. ६२ बाधित रु ग्ण बरे होऊन त्यांना घरी सोडण्यात आले असल्याचे सांगण्यात आले.